Saam Tv
Saam Tv
लाईफस्टाईल

World Thyroid Day 2023 : थायरॉईडच्या त्रासाला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी 'या' हेल्दी ड्रिंक्सचा आस्वाद घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Thyroid Day : थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे, जी मानेच्या श्वासनलिकेच्या समोर असते. हा एक प्रकारचा हार्मोन आहे. जी घशात असलेल्या थायरॉईड ग्रंथीपासून बनते. शरीराच्या वजनापासून ते मेंदूपर्यंत सर्व गोष्टींवर त्याचा परिणाम होतो.जर हा हार्मोन शरीरात जास्त प्रमाणात तयार होत असेल तर तुम्ही थायरॉईडच्या आजाराला बळी पडू शकता. या आजाराची वाढती प्रकरणे लक्षात घेऊन दरवर्षी 25 मे रोजी जगभरात जागतिक थायरॉईड दिवस साजरा केला जातो.

हा दिवस साजरा (Celebrate) करण्यामागचा उद्देश लोकांना थायरॉईडची जाणीव करून देणे हा आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत आम्ही काही हेल्दी ड्रिंक्सबद्दल सांगणार आहोत, ज्यांचे नियमित सेवन थायरॉइडवर नियंत्रण ठेवू शकते.

हळदीचे दूध

हळदीचे दूध पिण्याचे अनेक फायदे (Benefits) आहेत आणि त्यात दाहक-विरोधी आणि जंतुनाशक गुणधर्म आहेत. थायरॉईडच्या रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर आहे. तुम्हाला हवे असल्यास त्यात काळी मिरीही मिसळू शकता. त्यामुळे थायरॉईड नियंत्रणात येऊ शकते.

अॅपल सायडर व्हिनेगर

अॅपल व्हिनेगर थायरॉईड (Thyroid) संप्रेरक नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त आहे. हे प्यायल्याने पोट बराच काळ भरलेले राहते. यासाठी 1 टेबलस्पून अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळा आणि जेवणानंतर हे पेय प्या.

ताक

ताक हा प्रोबायोटिक्सचा उत्कृष्ट स्रोत आहे. हे प्यायल्याने तुमचे वजन आणि थायरॉईड दोन्ही नियंत्रणात राहतील. याशिवाय पचनक्रियाही निरोगी राहते. निरोगी राहण्यासाठी आहारात ताज्या ताकाचा अवश्य समावेश करा.

बीटरूट आणि गाजर रस

जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्ही बीटरूट आणि गाजरचा रस मिक्स करून प्या. हे फायटोन्यूट्रिएंट्स आणि लाइकोपीनचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात फायबर पुरेशा प्रमाणात असते.

ग्रीन ज्यूस

थायरॉईड रुग्णांच्या आहारात ग्रीन ज्यूसचा समावेश केला जाऊ शकतो. यासाठी ताजी पालक, कोथिंबीर, पुदिना किंवा काकडीचा रस प्या. या रसांमध्ये तुम्ही लिंबाचा रसही मिसळू शकता.

गवती चहा

हर्बल चहामध्ये अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. हे रोज प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात. थायरॉईडच्या रुग्णांना याचा फायदा होऊ शकतो.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sanjay Raut: सांगलीत भाजपचा अधिकृत अन् एक अनधिकृत उमेदवार; संजय राऊतांचा विशाल पाटील यांना टोला

Acidity Tips: वारंवार पित्त खवळंतय?हे घरगुती उपाय ठरतील रामबाण

Today's Marathi News Live : राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी; काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

Voter Awareness Programme: मतदान करा हाे... मतदान करा..., मावळात वासुदेव करताहेत मतदारांची जागृती

Teeth Whitening Tips : पिवळेपणा जाऊन दात मोत्यासारखे चमकतील; आठवडाभर ट्राय करा 'या' पेस्ट

SCROLL FOR NEXT