दिवाळीला सुरुवात झाली असून या दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणात गोडधोड खाणं होतंच. यावेळी सर्वात मोठं टास्क असतं ते म्हणजे मधुमेहाच्या रूग्णांनी खाण्याचं कसं मॅनेजमेंट केलं पाहिजे. मात्र यावेळी दिवाळीमध्ये मधुमेहाच्या रूग्णांसाठी एक चांगली बातमी आहे. यावेळी तुम्हाला तुम्हाला गोड पदार्थांवर पाणी सोडण्याची गरज नाही. इथे प्रश्न आहे तो सजगपणे निवड करण्याचा – अधिक चांगले पर्याय निवडण्याचा आणि नव्या मधुमेह-स्नेही घटकांचा शोध घेण्याचा. असे करून तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवू शकाल.
तुमच्या रक्तातील साखरेची पातळी फक्त साखरेच्या सेवनाने वाढत नाही. यामध्ये तुमच्या आहारातील कार्बोहायड्रेट्स अर्थात कर्बोदकांच्या एकूण प्रमाणाचं मॅनेजनेंट करणंही महत्त्वाचं आहे. साखर, कार्ब्जचा रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. फक्त साखर टाळणं पुरेसं नाही तर इतरही अनेक बाबी विचारात घेतल्या पाहिजेत. साखरेसाठी पर्याय म्हणून वापरलेल्या पदार्थांमुळे आहारातील कॅलरीज आणि कार्ब्जची संख्या कमी होते हे खरे असले तरीही त्यांच्यामुळे भूक लागण्यामध्ये आणि रक्तातील साखरेच्या नियमनामध्ये भूमिका बजावणाऱ्या पोटातील उपकारक बॅक्टेरियाला त्रास होऊ शकतो.
अबॉटच्या न्यूट्रिशन बिझनेस विभागाचे असोसिएट डिरेक्टर डॉ. इरफान शेख यांनी सांगितलं की, मधुमेहाचं व्यवस्थापन करणं म्हणजे स्वत:ला खाण्यापासून वंचित ठेवणं असा होत नाही – तर हुशारीने संपूर्ण माहितीनिशी निवड करणं असा होतो. रक्तातील साखरेची पातळी सांभाळण्याची गुरुकिल्ली म्हणजे तुमच्या आहाराचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी करणाऱ्या पोषक घटकांचे योग्य संतुलन साधणं. जर तुम्ही या घटकांचा विचारपूर्वक आणि योग्य प्रमाणात एकत्र करून तुमच्या आहाराचा GI नियंत्रित करू शकता. यामुळे ग्लुकोजची पातळी नियंत्रणात आणण्यास मदत होते.”
एंडोक्रिनोलॉजिस्ट आणि इंडियन अकॅडेमी ऑफ डायबेटिसचे अध्यक्ष प्रा. डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं की, “चांगलं पोषण हा कोणत्याही प्रकारच्या मधुमेहाच्या व्यवस्थापनातील महत्त्वाचा घटक आहे. डायबेटिक स्पेसिफिक न्यूट्रिशऩ (DSN)मुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणाचं नियमन होतं. यामुळे गरजेच्या अत्यावश्यक पोषक घटकांचा पुरवठाही शरीराला होतो.
डॉ. जोशी पुढे म्हणाले की, विशेषीकृत (स्पेश्यलाइझ्ड) पोषणाचा आहारात समावेश केल्याने काही अत्यावश्यक घटकांच्या उणीवा भरून निघू शकतात. यामुळे भोजनोत्तर साखरेच्या पातळीवर अधिक चांगले नियंत्रण राखलं जाऊ शकतं. ज्यामुळे तुम्हाला रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढण्याची चिंता न करता सणांचा आनंद मनसोक्त अनुभवता येतो. मधुमेहासह जगणाऱ्या व्यक्तींसाठी माझा मंत्र आहे “हळूहळू खा, वेळेवर खा, योग्य आहार घ्या, अधिक चाला, योगासने करा, चांगली झोप घ्या आणि छान हसा”
डायबेटिस-स्पेसिफिक न्यूट्रिशन मधुमेहींना अपराधीपणाच्या भावनेशिवाय गोड पदार्थांचा आनंद मिळवून देण्याचा एक मार्ग आहे. DSN उत्पादने ग्लायकेमिक परिणाम कमी व्हावा अशाच प्रकारे तयार करण्यात येतात. ज्यामुळे ती भरपूर कर्बोदके असलेल्या, साखरेत घोळलेल्या पदार्थांना एक चांगला पर्याय ठरतात. तुमच्या सणासुदीच्या पक्वान्नांमध्ये DSN आणि इतर मधुमेह-स्नेही घटक समाविष्ट करण्यासाठी काही टिप्स पुढीलप्रमाणे:
गोड मिल्कशेक्स किंवा स्मूदीजऐवजी DSN शेक मिक्सचा बेस म्हणून वापर करा आणि त्यात बेरीज किंवा अंजिरासारख्या फळांचा समावेश करा.
प्रक्रिया केलेली रिफाइन्ड शुगरच्या जागी माफक प्रमाणात कृत्रिम स्वीटनर्सचा वापर करा.
पारंपरिक फराळ बनवताना कार्ब्सचं उच्च प्रमाण असलेल्या घटकांच्या जागी DSN पावडर किंवा बदामाचे पीठ किंवा ओट फ्लोरसारख्या लो-GI पिठांचा वापर करा.
बासमती तांदळासारख्या हाय-GI पदार्थांऐवजी ब्राऊन राइसचा वापर करा आणि नेहमीच्या गव्हाच्या चपात्यांऐवजी नाचणी, बाजरी किंवा ज्वारीच्या भाकरीसारखे पर्याय वापरा.
वेलची आणि भाजलेले बदाम टाकलेल्या दुधात किसलेलं गाजर हळूहळू शिजू द्या. पाणी उडून जाईपर्यंत शिजवा, जेणेकरून एक दाट, सायीसारखे मिश्रम भांड्यात उरेल. भाजलेल्या बदामाच्या काप टाकून वरून सजवा.
तुपामध्ये शेवयांना सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. मग त्यांना दूध आणि खव्याच्या मिश्रणात टाकून मिश्रण दाट होईपर्यंत हळूहळू शिजू द्या. केसरच्या हलक्याशा शिडकाव्याने या खिरीला रंग आणि स्वाद मिळेल.
मुगाची डाळ आणि तांदूळ मंद आंचेवर हळूहळू शिजत ठेवा. हे मलाईदार मिश्रण मुख्य घटक म्हणून वापरा. तूप टाकून त्याला एक शाही स्वाद द्या. त्यात सढळ हातान भाजलेले नट्स आणि कोमट दूध टाकले की उबदार, पोषण घटकांनी समृद्ध पक्वान्न तयार
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.