आयलायनर लावता येत नाही ? 'या' टिप्सने वाढवा डोळ्यांचे सौंदर्य 
लाईफस्टाईल

आयलायनर लावता येत नाही ? 'या' टिप्सने वाढवा डोळ्यांचे सौंदर्य

आयलायनरशिवाय तुम्हाला तुमचे डोळे आकर्षक दिसावेत असे वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

असं म्हणतात की, डोळे (Eyes) एखाद्या व्यक्तीच्या हृदयाचा आरसा असतात. एखादी व्यक्ती तोंडाने खोटं बोलू शकते पण तिचे डोळे कधीही खोटं बोलत नाही. त्याच वेळी, जेव्हा मेकअपचा प्रश्न येतो तेव्हा डोळ्यांच्या मेकअपशिवाय (Makeup) मेकअप अपूर्ण वाटतो. काजळ, आयलायनर (eyeliner) मुळे डोळ्यांना एक वेगळाच लूक येतो. पण अनेक महिला आहेत ज्यांना आयलाइनर कसे लावावे हे माहित नाही. पण आयलायनरशिवाय तुम्हाला तुमचे डोळे आकर्षक दिसावेत असे वाटत असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. (Enhance the beauty of the eyes without applying eyeliner)

आयलॅश कर्लर आणि मस्करा - जर तुम्हाला लाइनर कसे लावायचे हे माहित नसेल तर लॅश कर्लर आणि मस्करा हे तुमच्यासाठी योग्य पर्याय आहेत. पापण्यांना व्हॉल्यूमिंग मस्करा लावल्यानेही डोळे अधिक आकर्षक आणि सुंदर दिसतात.

आयब्रो - आयब्रो केल्याने तुमच्या चेहऱ्याला सुंदर लुक तर येतोच, पण त्याने डोळेही अधिक सुंदर दिसतात. आयब्रोला मॅच होणारे आयब्रो कलर घ्या आणि सुंदर आकार द्या त्यामुळे चेहऱ्यासोबतच डोळेही अधिक सुंदर दिसतील.

डोळ्याचे इनर हायलाइट करा- डोळे मोठे दिसण्यासाठी, तुम्ही हायलायटर किंवा कोणत्याही ब्राइट किंवा पॉप रंगाच्या शेडने डोळ्यांच्या आतील कोपरे आणि भुवयांच्या अगदी खाली हायलाइट करू शकता.

रंग काजल- डोळे मोठे दिसण्यासाठी तुम्ही रंगीत काजळ वापरू शकता. डोळ्यांच्या बाह्य कोपरापासून ते डोळ्यांच्या मध्यभागी काजल हलक्या हाताने लावा, यामुळेही तुमच्या डोळे आकर्षक दिसतील.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT