Home Remedies For Dark Underarms Saam Tv
लाईफस्टाईल

Home Remedies For Dark Underarms : काळवडंलेल्या अंडरआर्म्समुळे स्लिवलेज घालायला लाजताय ? हे 3 घरगुती उपाय ट्राय करा

How to Remove Dark Underarms : स्लिवलेस ड्रेस तेव्हाच चांगले दिसतात जेव्हा आपले अंडरआर्म्स स्वच्छ व लखलखीत असतात.

कोमल दामुद्रे

Dark Underarms : उन्हाळ्यात स्लिवलेस ड्रेस फक्त उकाड्यापासूनच आराम देत नाहीत, तर आपल्या एकूणच समर फॅशनचा लूक पूर्ण करतात. पण स्लिवलेस ड्रेस तेव्हाच चांगले दिसतात जेव्हा आपले अंडरआर्म्स स्वच्छ व लखलखीत असतात.

उन्हाळ्यात काळे अंडरआर्म्स लाजेचे कारण बनतात. अंडरआर्म्स काळ्या होण्यामागे अनेक कारणे आहेत. उन्हाळ्यात (Summer) जास्त घाम, अंडरआर्म्सच्या स्वच्छतेची नीट काळजी न घेणे या कारणांमुळे अंडरआर्म्स काळे पडू शकतात. काही लोक अति धुम्रपान (Smoking) करतात सिगारेटमधून निघणाऱ्या टॉक्सिन सेल्स पिगमेंट संपवतात ज्यामुळे अंडरआर्म्सची त्वचा काळी होण्याची शक्यता अधिक असते.

तुम्ही सुध्दा अंडरआर्म्सच्या काळेपणापासून त्रस्त असाल तर या सवयींना आजच बदला. उन्हाळ्यात सैल कपडे घाला, परफ्यूम आणि स्प्रेचा वापर करू नका, व्हॅक्सिंगसाठी रेझरचा वापर चुकूनही करू नये. रेजरमुळे त्वचा काळवंडते.

अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे कॉस्मेटिक्स उपलब्ध आहेत. पण त्यांचा त्वचेवर साईड इफेक्ट होऊ शकतो. त्यामुळे आम्ही आज आपल्यासाठी काही घरगुती उपाय घेऊन आलो आहोत जाणून घेऊया त्याबद्दल

1. संत्र्याची साल, दूध (Milk) आणि गुलाब पाण्याची पेस्ट

अंडरआर्म्सचा काळेपणा घालवण्यासाठी संत्र्याची साल, दूध आणि गुलाब पाण्याची पेस्ट एक उत्तम पर्याय आहे. ही पेस्ट बनवण्यासाठी संत्र्याच्या सालीला सुकवून मिक्सरमध्ये बारीक पूड करुन घ्या. आता या पूडीत एक चमचा दूध आणि एक चमचा गुलाब पाणी घालून या मिश्रणाला व्यवस्थित मिक्स करुन त्याची पेस्ट बनवा. तयार पेस्टला आपल्या आंडर आर्म्सवर लावा आणि एखाद्या स्क्रबप्रमाणे 15 मिनिटे राहू द्या. त्यानंतर थोडा वेळ हलक्या हाताने मसाज करुन थंड पाण्याने धुवून टाका.

2. एरंडीचे तेल

अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही एरंडीच्या तेलाचा वापर करू शकता. नॅशनल सेंटर ऑफ बायोलॉजी इंफॉर्मेशनच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेल्या एका अहवालानुसार एरंडीचे तेल त्वचेला स्वच्छ करते आणि त्वचा उजळवण्यास मदत करते. या तेलाने रोज मसाज केल्यास त्वचेचा काळेपणा कमी होतो.

3. हळद

अनेक औषधी गुणांनी संपन्न असलेली हळद त्वचेवर टॉनिक प्रमाणे काम करते. त्यामुळे अंडरआर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी अतिशय गुणकारी आहे. हळदीत असलेला करक्यूमिन नावाचा पदार्थ त्वचेला घाणीपासून दूर ठेवेत आणि काळवंडलेल्या त्वचेस चमकण्यास मदत करते. अंडर आर्म्सचा काळेपणा दूर करण्यासाठी चिमुटभर हळद, चमचाभर दूध आणि एक चमचा मध घालून पेस्ट तयार करून घ्या. 15 मिनिटे हलक्या हातांनी मालिश करा व त्यानंतर पाण्याने व्यवस्थित स्वच्छ करा.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Airport: कसं असेल नवी मुंबई विमानतळ? विमानतळावर 5G कनेक्टिव्हिटी आणि 'डिजी यात्रा' सुविधा

Mumbai News : धक्कादायक! प्रसिद्ध हॉटेलकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; ऑनलाइन मागवलेल्या 'बटर चिकन'मध्ये आढळली माशी

Wednesday Horoscope : आरोग्याच्या तक्रारी वाढणार, जवळच्या लोकांकडून दगाफटक्याची शक्यता; ५ राशींच्या आयुष्यात होणार मोठी घडामोड

भीषण अपघात! धावत्या बसवर कोसळला डोंगराचा ढिगारा, १५ जणांचा मृत्यू

Maharashtra Live News Update : पवईमध्ये पेट्रोलपंपावर मोटारसायकला लागली भीषण आग

SCROLL FOR NEXT