Elista 4k QLED 4K Smart TV Saam Tv
लाईफस्टाईल

4k QLED Smart TV: आला सर्वात स्वस्त 75 inch Smart TV, घरबसल्या मिळेल सिनेमा हॉलसारखी मजा; जाणून घ्या किती आहे किंमत

Satish Kengar

Elista 4k QLED 4K Smart TV Features:

जर तुम्हाला घरबसल्या थिएटरची मजा हवी असेल आणि त्यासाठी मोठा टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एलिस्टाने आपला नवा 75 इंचाचा टीव्ही लॉन्च केला आहे.

कंपनीचा दावा आहे की, हा भारतातील सर्वात स्वस्त 75-इंचाचा टीव्ही आहे, जो अल्ट्रा-प्रीमियम QLED 4K डिस्प्लेसह येतो आणि WebOS TV वर चालतो. जर तुम्ही कमी बजेटमध्ये मोठा डिस्प्ले असलेला टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा एक उत्तम पर्याय असू शकतो. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

75 इंच QLED आणि डॉल्बी ऑडिओ

एलिस्टा 75-इंचाचा 4K QLED स्मार्ट टीव्ही वेबओएस युजर्स इंटरफेससह सुसज्ज आहे. यात एक मोठा 75-इंच 4K रिझोल्यूशन (3840x2160 पिक्सेल) QLED पॅनेल आहे. आधुनिक ऑडिओ आणि व्हिडिओ तंत्रज्ञानाने सुसज्ज, स्मार्ट टीव्ही तुमच्या लिव्हिंग रूममध्ये सिनेमा पाहण्याचा अनुभव देण्यासाठी डिझाइन केलेले आहे. (Latest Marathi News)

पॉवरफुल डिस्प्ले व्यतिरिक्त, टीव्ही डॉल्बी ऑडिओ सपोर्ट इमर्सिव्ह ऑडिओ सेटअप आहे. टीव्हीमध्ये 20W साऊंड आउटपुटसह स्पीकर सिस्टम आहे. हा टीव्ही तुम्ही भिंतीवर टांगू शकता किंवा टेबल टॉप स्टँड वापरून टेबलवर ठेवू शकता.

कंपनीचे म्हणणे आहे की, 75-इंचाचा QLED पॅनेल जबरदस्त Picture Quality आणि बेस्ट -इन-क्लास viewing अँगल प्रदान करते. MEMC @60 Hz तंत्रज्ञानामुळे, लो-फ्रेम रेट कंन्टेट देखील स्मूथ व्हिज्युअलचा आनंद घेता येतो. कनेक्टिव्हिटीसाठी टीव्ही 2T2R (ड्युअल बँड) तीन HDMI, दोन USB, AV इन, ऑप्टिकल आउट आणि इअरफोन पोर्टसह वाय-फाय आणि ब्लूटूथ 5.0 ने सुसज्ज आहे.

किंमत

कानोपनिने या स्मार्ट टीव्हीची प्रारंभिक किंमत 1,59,999 रुपये इतकी ठेवली आहे. हा टीव्ही सर्व आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स स्टोअर्स आणि ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. कंपनीच्या वेबसाइटनुसार, टीव्हीची एमआरपी 2,00,990 रुपये आहे. म्हणजेच हा टीव्ही कंपनी एमआरपीपेक्षा 40,991 रुपयांनी कमी किंमतीत विकत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT