eBikeGo आणि Acer यांनी मिळून Acer MUVI 125 4G इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च केली. ज्याची किंमत 1 लाख (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. देशातील इलेक्ट्रिक वाहनांमध्ये ही ब्रँडची एंट्री-लेव्हल ईव्ही आहे
इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय इलेक्ट्रिक मोबिलिटी प्लॅटफॉर्म eBikeGo च्या भागीदारीत लॉन्च करण्यात आली आहे. eBikeGo याची डिझाइन आणि निर्मिती करेल. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
MUVI 125 4G ची प्री- बुकिंग
MUVI 125 4G ची प्री- बुकिंग eBikeGo कडून Acer ब्रँडच्या अधिकारानुसार MUVI 125 4G ची प्री-बुकिंग लवकरच सुरू केली जाईल. (Latest Marathi News)
ही इलेक्ट्रिक स्कूटर पहिल्यांदा या वर्षी सप्टेंबरमध्ये ग्रेटर नोएडा येथे EV India Expo-2023 मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. हे स्वॅप करण्यायोग्य बॅटरीसह येते. दोन काढता येण्याजोग्या 48V 35.2Ah बॅटरी प्रत्येक चार्जवर 80 किमीची रेंज देते, असं कंपनीचं म्हणणं आहे. याची टॉप स्पीड तशी 75 किमी आहे. सुमारे चार तासांत याची बॅटरी फुल चार्ज होऊ शकते, असा कंपनीचा दावा आहे. ग्राहक फक्त एका बॅटरीचा पर्याय देखील निवडू शकतात.
ही EV हलक्या वजनाच्या चेसिससह येते, जी 16-इंच चाकांवर धावत. ही तीन रंग पर्यायसह येते. तुम्ही ही EV तुमच्या Android किंवा iOS स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. ही ब्लूटूथ-सपोर्टिंग 4-इंच एलसीडी स्क्रीनसह येते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.