Mumbai News: मुंबईत 134 इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारली जाणार - Saam Tv
लाईफस्टाईल

Mumbai News: मुंबईत 134 इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उभारली जाणार

मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर तोडगा म्हणून इलेक्ट्रीक वाहनांवर अधिक भर देण्यात येत आहे. त्यासाठी इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासणार असल्याने मुंबईत 134 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत

साम टिव्ही

(मिलिंद तांबे)
मुंबई : मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर तोडगा म्हणून इलेक्ट्रीक वाहनांवर अधिक भर देण्यात येत आहे. त्यासाठी इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन्सची आवश्यकता भासणार असल्याने मुंबईत 134 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. (Electric Vehicle charging stations to be erected in Mumbai)

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाशी संलग्न असलेल्या महाप्रीत या उपकंपनीच्या माध्यमातून हे चार्जिंग स्टेशन (Electric Vehicles) उभारण्यात येणार आहेत अशी माहिती महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी दिली.

इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन ही महाप्रीतची महत्त्वाकांक्षी योजना आहे. सध्या मुंबई महापालिका परिसरामध्ये 134 चार्जिंग स्टेशनचा आराखडा तयार करण्यात आला आहे. उर्वरित स्टेशन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येतील. भारत सरकारच्या (India) एसएलआर या पॉवर कंपनीची त्यासाठी मदत घेण्यात येत आहे.

मुंबईत 134 चार्जिंग स्टेशन उभारल्या नंतर राज्यभरात साधारणता 150 चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. यासाठी महाप्रीतने भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ पॉवर यांच्याशी देखील करार केला आहे. याशिवाय डिपार्टमेंट ऑफ हेवी इंडस्ट्रीज च्या सहकार्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात मुंबई ते नाशिक आणि नाशिक ते नागपूर या महामार्गावर हे चार्जिंग स्टेशन उभारण्याची योजना आहे.तोल नाका,महत्वाचे सर्कल,फूड मॉल, पेट्रोल पंप अश्या मोक्याच्या ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभे राहणार आहेत. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

अशा पद्धतीने 68 ते 70 चार्जिंग स्टेशन उभे राहतील. फास्ट चार्जिंगचा एक उपक्रम देखील आम्ही राबवण्यात येणार आहे. महामार्गांवरील मोक्याच्या 70 ते 80 ठिकाणी फास्ट चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे.

असा उभारणार निधी

योजनांसाठी लागणारा निधी उभा करण्यासाठी तीन प्रकारचे स्त्रोत विकसित केले आहेत.पायाभूत सुविधांसाठी लागणारा पैसा उभा करण्यासाठी आयआयएफ सोबत करार केला आहे. यासह ॲपेक्स पार्टनर म्हणून काही योजना राबवण्यात येणार आहेत. त्याशिवाय भारत सरकारच्या वेगवेगळे विभागांशी संपर्क साधून आर्थिक मदत घेण्यात येत आहे.

मागासवर्ग घटकाला योजनेचा लाभ

मागास वर्ग घटकाचा सर्वांगीण विकास हाच महाप्रीतचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे ती चार्जिंग स्टेशनची योजना हे फक्त मागासवर्गीय घटकांसाठी असून त्यांच्या माध्यमातूनच हे चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत. पुढील दहा वर्षात 40 लाख मागासवर्ग युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.

अशी करा नोंदणी

महाप्रीत मध्ये वेगवेगळे उपविभाग केले आहेत.जे मागासवर्गीय लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी नोंदणी अभियान सुरू केले आहे. नवयुग योजनेच्या माध्यमातून ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे पात्र उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी नोंदणी करता येणार आहे.

Edited By- Amit Golwalkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aditya Roy Kapoor : व्हायचं होतं क्रिकेटर, झाला अभिनेता; एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले

Sangli Politics: बंटी पाटलांसारखं वागलो तर जिल्ह्यात एकही पक्ष शिल्लक राहणार नाही, विश्वजीत कदम यांनी पवारांच्या राष्ट्रवादीला खडसावलं

Maharashtra Election : टपाली मतपत्रिकेचा फोटो गावाकडं व्हॅट्सअॅप पाठवला, पोलिसावर गुन्हा दाखल

Weight And Height Chart: तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन किती असलं पाहिजे? पाहा संपूर्ण चार्ट

Bank Job: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर होण्याची सुवर्णसंधी; ५९२ पदांसाठी भरती, पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT