Eggs Harmful For Heart Saam Tv
लाईफस्टाईल

Eggs Harmful For Heart : कोलेस्ट्रॉलसाठी अंडी फायदेशीर पण हृदयासाठी घातक? जाणून घ्या

Eggs Harmful : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. खरंतर प्रत्येक व्यक्तीने दररोज अंड्याचे सेवन केले पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Heart Disease By Eggs : संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे. खरंतर प्रत्येक व्यक्तीने दररोज अंड्याचे सेवन केले पाहिजे. अंड हे एक कम्प्लीट फूड मानले जाते. याचं कारण म्हणजे, अंड्यामध्ये अनेक पोषक तत्वे उपलब्ध असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात. परंतु बऱ्याचदा अंड्यांना हृदयासंबंधीच्या आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही.

बरोबर तुम्ही बऱ्याचदा असं ऐकलं असेल की, अंड्यांमध्ये (Eggs) कोलेस्ट्रॉल भरपूर प्रमाणात असते, त्यामुळे अंड्याचे सेवन अगदी कमी प्रमाणात किंवा नाही केले तरी चालेल. परंतु ही गोष्ट योग्य आहे की अयोग्य आहे हे जाणून घेऊया.

अंड्यांमध्ये बॅड कोलेस्ट्रॉल असते का?

ही गोष्ट अगदी शंभर टक्के खरी आहे की, अंड्यांमध्ये भरपूर प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते. परंतु याशिवाय अंड्यांमध्ये व्हिटामिन (Vitamin), खनिज पदार्थ आणि स्वस्थफॅट सुद्धा उपलब्ध असतात. सोबतच अंड्यांमध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, आणि सोडियम सुद्धा उपलब्ध असते.

त्याचबरोबर अंड्यांमध्ये कॉपर, आयोडीन, आयरन, मॅग्नेशियम, मॅग्नीज, सेलेनियम आणि झिंक सुद्धा उपलब्ध असते. एवढ्या सगळ्या पोषक तत्वांनी भरपूर असलेले अंड तुम्ही डायट मधून काढून टाकत असाल तर, तुम्ही विचार करा की तुम्ही तुमच्या शरीराला या सगळ्या पोषक तत्वांपासून लांब ठेवत आहात.

दिवसामधून किती अंड्यांचे सेवन केले पाहिजे?

अनेक शोधकरत्या व्यक्ती अंड्यावर शोध करत असतात. अनेक शोधांमध्ये असे सांगितले गेले आहे की, दिवसातून एका अंड्याचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळते.

अंडी किती खाल्ली पाहिजेत यासोबतच हे जाणून घेण गरजेचे आहे की, अंडी कोणत्या प्रकारे खाल्ली पाहिजे. अंड सगळ्या प्रकारच्या पदार्थांसोबत खाल्ले जाऊ शकते. अनेक व्यक्ती अंड्याला सॅलडपासून ते सँडविच आणि मेनडिश पर्यंत खाण्यासाठी पसंती दाखवतात.

तुम्ही अंड्याचे सेवन जर, बटर, बेकन, वेगवेगळ्या प्रकारचे सॉसेस, मफिन सोबत खाल्ले तर, अंड्यापेक्षा या सगळ्या गोष्टी तुमच्या शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढवतात. त्यामुळे तुम्ही अंडी कशा पद्धतीने खात आहात ही गोष्ट मॅटर करत नाही.

आरोग्यासाठी किती अंडी खाल्ली पाहिजे?

बोस्टन युनिव्हर्सिटीद्वारा केलेल्या रिसर्चनुसार, अंड्याचे नियमित सेवन केल्याने ब्लड प्रेशर, टाईप टू डायबिटीस आणि ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. अमेरिकन हार्ट असोसिएशननुसार, एका अंड्यामध्ये 78 कॅलरीज उपलब्ध असतात आणि सहा ग्रॅम एवढे प्रोटीन उपलब्ध असते. एक अंड खाल्ल्याने तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही असे म्हटले जाते.

हाय कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींनी अंड्याचे सेवन केले पाहिजे?

या प्रश्नाचे उत्तर अतिशय कठीण आहे, कारण की अंड्याची जर्दी कोलेस्ट्रॉलचे भंडार असते, आणि ज्या व्यक्ती हाय कोलेस्ट्रॉल या समस्येपासून झगडत आहेत, त्यांना अंड्याचे सेवन करण्यापासून सक्त मनाई केली जाते. सोबतच अंड्याच्या जर्दीमध्ये पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात जे दुसऱ्या कोणत्याही पदार्थांमध्ये उपलब्ध नसतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Gang war: भर चौकात गणेशचा केला गेम; हाती कोयता घेऊ मारेकऱ्यांची धूम, हत्याकांडाचा CCTV आला समोर

Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य,धक्कादायक कारण आलं समोर

Akola Crime: 'माझं तुझ्यावर खूप प्रेम; अग्निवीर जवानाकडून लग्नाच्या भूलथापा, 29 वर्षीय किन्नरवर अत्याचार

दोन पिस्तूल, कोयता आणि भयानक कट… असा रचला अक्षय नागलकरच्या हत्येचा प्लॅन|VIDEO

Raigad News: पोहण्याचा मोह जिवाशी आला! अलिबागमधील समुद्रात दोन तरुण बुडाले, ड्रोनद्वारे शोध सुरू

SCROLL FOR NEXT