Sakshi Sunil Jadhav
येणारं नवं वर्ष आनंदात आणि काहीतरी गोड खाऊन सुरुवात करायची असेल तर राजगिऱ्याचा शिरा हा सगळ्यात सोपा उपाय आहे.
राजगिऱ्याचं पीठ, साखर, काजू बदाम, साजूक तूप, वेलची पावडर आणि गरम पाणी हे साहित्य पुरेसं आहे.
सगळ्यात आधी कढईत तूप तापवा. मग राजगिऱ्याचं पीठ टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
पिठाचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये काजू बदामाचे काप टाकून भाजून घ्या.
पीठ भाजताना त्याचा लालसर होईपर्यंत भाजा नाहीतर शिरा कच्चा होतो.
पीठात नंतर गरम पाणी टाका. नेहमीच्या प्रमाणापेक्षा थोडं कमी पाणी यामध्ये ओता. जास्त पाण्याने शिरा पातळ होईल.
आता त्यामध्ये वेलची पूड आणि साखर घाला. हे मिश्रण स्लो फ्लेमवर झाकण लावून ठेवा.
५ मिनिटांनी शिरा तयार होईल. हा तुम्ही नैवेद्यासाठी वापरू शकता.