किचनमध्ये रात्रीच्यावेळी हमखास झुरळ पाहायला मिळते. सुरुवातीला 2 ते 4 झुरळं झाल्यास आपण त्यांना मारून टाकतो. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यास झुरळांची झुंड काही कमी होत नाही. दिवसेंदिवस अनेक घरांमध्ये झुरळांच्या समस्या वाढतच चालल्या आहेत. घरात झुरळ झाल्यावर काय करावे आणि काय नाही सुचत नाही.
झुरळांचेप्रमाण वाढल्यानंतर अनेकदा ते खण्यापिण्याच्या गोष्टीमध्ये देखील शिरतात. खाण्यापिण्याच्या पदार्थात आणि भांड्यावर झुरळं आल्याने त्याने रोगराई वाढते. घरामध्ये अचानक व्यक्ती जास्त आजारी पडू लागतात. विनाकारण दावाखण्यात जास्तीचे पैसे खर्च करावे लागतात. त्यामुळे आज घरात जास्त झुरळे झाल्यावर त्यांना दूर करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबाबत जाणून घेऊ.
सुरुवातीला तुमचे घर किती मोठे आहे आणि त्यात किती झुरळे आहेत हे समजून घ्या. त्यानुसार कागदाचे तुकडे करून घ्या. त्यानंतर एखादं बिस्कीट किंवा गूळ घ्या. याचा बारीक चुरा करा.
त्यानंतर बारीक पावडर बनवून घ्या. या पावडरमध्ये एक एक करून थोडं पाणी मिक्स करा आणि बिस्किटाचा चुरा देखील मिक्स करा. त्यात कागदात हे मिश्रण भरा आणि घरात कानाकोपऱ्यात टाकून ठेवा. हा उपाय केल्याने घरातील सर्व झुरळांचा नायनाट होईल. घरामधील सर्व झुरळं मरुन जातील.
हा उपाय कठीण वाटत असेल तर आम्ही तुमच्यासाठी आणखी एक उपाय शोधला आहे. सर्वात आधी गॅसवर थोडं पाणी गरम करून घ्या. नंतर या पाण्यात एक कांदा शिजवा आणि कडुलिंबाचा पाला देखील टाकून घ्या. पाणी थंड करून घ्या. नंतर एका स्प्रे बॉटलमध्ये हे पाणी टाकून घ्या. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला झुरळ दिसतील तेथे हे पाणी फवारा. याने देखील घरात येणारे सर्व झुरळ पळून जातील. महत्वाचं म्हणजे हे उपाय दुपारी किंवा रात्री करा. शांतता असेल तेव्हा झुरळ बाहेर येतात. त्यामुळे यावेळेत झुरळ पळवण्याचे उपाय करा.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.