Eating Pizza Job Saam Tv
लाईफस्टाईल

Eating Pizza Job: काय सांगता ! चक्क पिझ्झा खाण्याचा मिळतो पगार ? कसा कराल नोकरीसाठी अर्ज

Eat Pizza and Earn Money: पण तुम्हाला माहीत आहे का ? या ठिकाणी चक्क पिझ्झा खाण्याचा पगार मिळतो.

कोमल दामुद्रे

Pizza Eating Job : पिझ्झा कोणाला आवडत नाही हल्ली लहानांपासून मोठापर्यंत प्रत्येकालाच खायला आवडतो. नाव जरी काढले तरी अनेकांच्या जीभेवर त्याची चव रेंगाळत असेलच. त्यातही व्हेज आणि नॉन व्हेजचे प्रकार अधिक.

पण तुम्हाला माहीत आहे का ? या ठिकाणी चक्क पिझ्झा (Pizza) खाण्याचा पगार मिळतो. काही कंपन्या आपल्या उत्पादनाचा दर्जा तपासण्यासाठी तसेच ही उत्पादने लोकांना आवडतील की, नाही हे तपासण्याठी फूड टेस्टिंगसाठी काही लोक नेमतात.

चॉकलेटपासून ते मद्यपर्यंतची चव घेऊन त्यांचा दर्जा सांगणाऱ्या अनेक नोकऱ्या आहेत. इतकेच नव्हे तर काही ठिकाणी गादीवर झोपून तिचा गुणवत्ता तपासण्याचे देखील पैसे दिले जातात. सध्या अशीच एक नोकरी (Job) चर्चेत आली आहे ती म्हणजे पिझ्झा खाण्याची !

हे ऐकून एकतर तुम्हाला हसू फुटेल किंवा उगाच काही तरी बळताय अस वाटू लागेल पण अमेरिका, वॉशिग्टंन मॅडिसन, विस्कॉन्सिन येथील डेअरी रिसर्च सेंटरने अलीकडेच नवीन संशोधक पदाची घोषणा केली आहे. यामध्ये आठवडाभर चीज, पिझ्झा व इतर पदार्थ (Food) टेस्ट करणे आवश्यक असते. त्यासाठी 'डिस्क्रिप्टिव्ह सेन्सरी पॅनेलिस्ट' या पदावर भरती केली जाणार आहे.

कामच्या एका तासासाठी चांगली रक्कमही दिली जाणार आहे. तसेच येथे होणाऱ्या पॅनेल चर्चेत, प्रशिक्षण सत्र व इतर कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी व्हावे लागेल. तसेच येथे निवड झालेल्या उमेदवाराला १५ डॉलर्स दिले जाणार आहे. नोकरीत रुजू झाल्यानंतर संशोधन व उत्पादन विकासासाठी काम करणे, तसेच पदार्थाची चव व सुगंध ओळखून त्यावर चर्चा करावी लागणार आहे.

पॅनेलवर रुझू असणाऱ्या सदस्यांना इतर पदार्थांसोबतच २४ पनीरचे नमुने व १२ पिझ्झाची चव चाखावी लागणार आहे. तसेच याव्यतिरिक्त अतिरिक्त काम देखील करावे लागणार आहे. जर तुम्ही या नोकरीसाठी पात्र असाल तर थेट विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठाच्या वेबसाइटला भेट देऊन या पदासाठी अर्ज करू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक, अध्यक्षपदासाठी भाजपचे राहुल लोणीकर यांच नाव चर्चेत

बनावट CBI चा मुंबई पोलिसांकडून भांडाफोड; सराफा व्यावसायिकांना लुटणाऱ्या आंतरराज्यीय टोळी जेरबंद

Pune Accident : पुणे-नाशिक महामार्गावर ३ वाहनांचा भीषण अपघात; कारचा चक्काचूर अन्...

Panner Chilli Recipe: घरच्या घरी बनवा स्ट्रीट फूडस्टाईल टेस्टी पनीर चिली, वाचा सोपी रेसिपी

Rain Alert : राज्यावर अल निनोचं संकट! कोकण-घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा; रायगड, पुणे घाटमाथ्याला ऑरेंज अलर्ट

SCROLL FOR NEXT