Pizza Causes : सावधान ! पिझ्झा खाताय ? त्याचे शौकिन असाल तर वेळीच थांबा, होऊन शकतो 'या' रोगाचा धोका

विज्ञानानुसार, एखादी व्यक्ती चांगल्या पदार्थांचे सेवन करत असेल तर त्याचे आयुर्मान वाढ शकते
Pizza Causes
Pizza CausesSaam Tv
Published On

Pizza Causes : पिझ्झा न आवडणारी माणसे ही आपल्यापैकी कमीच असतील. पिझ्झा हा आपल्यापैकी बरेच जणांना आवडतो अगदी लहान- मुलांपासून ते वयोवृध्दांपर्यंत सगळ्यांना.

पिझ्झाचे अनेक प्रकारही आहेत आणि त्याचे वेगवेगळे ब्रॅन्डही. चिज कॉन, पनीर-कॅप्सिकम, चिकन गोल्डन डिलाईट, चिकन डॉमिनेटर यासारखे विविध प्रकाराच्या पिझ्झाची चव आपल्याला चाखता येते.

जंक फूड (Junk Food) खाण्यापासून ते कोलेस्टेरॉलमुळे वजन वाढण्याचा धोका नेहमीच असतो. निरोगी जीवनशैलीसाठी प्रत्येकाला खाण्यापिण्याकडे खूप लक्ष द्यावे लागते. लोकांना पिझ्झा, बर्गर, चीजपासून बनवलेल्या वस्तू, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड, हॉट डॉग खाण्यास अधिक आवडतात, पण तुम्हाला माहित आहे का की या गोष्टींमुळे इतर अनेक आजारांचा (Disease) धोका निर्माण होतो.

Pizza Causes
Workout Tips : महिलांनी 'या' काळात करु नये वर्कआउट, अन्यथा...

नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात असे दिसून आले आहे की पिझ्झा, बर्गर यासारख्या गोष्टी खाल्ल्याने कर्करोग, मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल होण्याचा धोका वाढतो.

मेडिकल न्यूज टुडेच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेच्या टफ्ट्स युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनात हे स्पष्ट झाले आहे की, अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडच्या सेवनाने पुरुषांमध्ये कोलोरेक्टल कॅन्सरचा धोका वाढतो. यासोबतच पिझ्झा खाल्ल्याने हृदयविकाराचा धोकाही मोठ्या प्रमाणात वाढतो.

पिझ्झा, बर्गर आणि अल्ट्रा प्रोसेस्ड फूड्समध्ये कॅलरीज, फॅट आणि कार्बोहायड्रेट्स जास्त असतात. त्यामुळे वजन वाढते आणि हृदयाचा धोकाही वाढतो. अतिप्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्याने मधुमेह होण्याची शक्यता वाढते, कारण त्यात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते.

Pizza Causes
Sleeping Position : तुम्ही कोणत्या कुशीवर झोपताय ? तज्ज्ञ सांगताय त्याच्या अनेक आजारांबद्दल

पिझ्झा, हॉट डॉग, चिकन नगेट्स, फिश स्टिक्स,कोल्ड ड्रिंक्स, सोडा, एनर्जी डिंक्स, कँडी, दही, आइस्क्रीम, डोनट्स यांसारख्या पदार्थांमध्ये कॅलरी अतिप्रमाणात असतात. ज्यामुळे आपण इतर अनेक आजारांना बळी पडू शकतो. त्यासाठी वेळीच कोणत्या पदार्थांचे सेवन किती असायला हवे हे आपल्याला कळायला पाहिजे.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com