Eating Tomato Benefits  Saam Tv
लाईफस्टाईल

Eating Tomato Benefits : हिवाळ्यात रोज एक टॉमेटो खा, आजारांपासून दूर राहा; जाणून घ्या फायदे

Tomato Benefits : हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. थंडीत शरीराची विशेष काळजी घेणे महत्त्वाची आहे. या काळात खूप जास्त थंडी वाजते.

Shraddha Thik

Winter Care :

हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. थंडीत शरीराची विशेष काळजी घेणे महत्त्वाची आहे. या काळात खूप जास्त थंडी वाजते. त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. अशा काळात शरीराला आवश्यक तत्वे मिळणे महत्त्वाचे आहे. थंडीत टॉमेटो खालल्याने खूप फायदे होतात.

टॉमेटोमध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे हिवाळ्यात टॉमेटो खालल्याने खूप फायदे (Benefits) होतात. हिवाळ्यात कच्चा टॉमेटो खालल्याने शरीर हायड्रेट राहते. शरीराला मुबलक प्रमाणात मल्टीन्यूट्रीएंट्स मिळतात.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रोज कच्चा टॉमेटो खाणे फायदेशीर

हृदयाच्या आजारांसाठी फायदेशीर

टॉमेटोमध्ये लाइकोपीन जास्त प्रमाणात असते. यामधील अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी फायदेशीर असतात. नेहमी टॉमेटो (Tomato) खालल्याने हृयविकाराचा धोक १४ टक्क्यांनी कमी होते. तसेच रक्तातील कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स कमी करते. शरीरातील एचडीएल कोलेस्ट्ऱॉल वाढवते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

डायबिटीजवर गुणकारी

डायबिटीजच्या रुग्णांनी रोज एक टॉमेटो खावा. टॉमेटोमधील लाइकोपीन इन्सुलीन पेशी सुधारण्यास मदत करते. हे शरीरातील सूज कमी करते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. टॉमेटो शरीरातील फायबर मेटाबॉलिक रेट वाढवतो आणि डायबिटीज कमी करण्यास मदत करते.

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास फायदेशीर

टॉमेटोमध्ये विटामिन सी असते. त्यात बीटा-कॅरेटीन असते. ते तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे अनेक आजारांपासून संरक्षण होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील 11 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT