Food Combinations saam tv
लाईफस्टाईल

Food Combinations: कमालीचं आहे 'या' पदार्थांचं कॉम्बिनेशन, दिवसभर राहलं ताजंतवानं

best combination food: तुमचा आहार तुमचे आरोग्य मजबूत करू शकते. ज्याप्रमाणे काही गोष्टी एकत्र खाऊ नयेत त्याचप्रमाणे काही गोष्टी एकत्र खाल्ल्याने फायदा होतो. असेच भातासोबत 6 फूड कॉम्बिनेशन आपण पाहणार आहोत. ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत होईल.

Saam Tv

दही भात खाण्याचे फायदे

भातातून आपल्याला फायबर, प्रथिने, कर्बोदके मिळतात. त्यासोबत दही खाल्ल्याने कॅल्शियम, जीवनसत्त्वे, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस, रिबोफ्लेविन इ. सर्व गोष्टी एकत्रितपणे स्नायू, हाडे आणि मेंदूला आवश्यक पोषण देण्यासाठी कार्य करतात.

चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने शरीरात ताकद शिल्लक राहत नाही, होडे कमकूवत होतात. योग्य आहार खाल्ल्यानेच आपण चांगले, निरोगी जीवन जगू शकतो. काही खाद्यपदार्थ एकत्र खाल्ल्याने दुहेरी फायदा होतो. कारण एकाची कमतरता दुसऱ्याद्वारे भरून काढली जाते आणि ते मिळून संपूर्ण पोषक आहार तयार करतात. जे आयुर्वेदात सर्वात फायदेशीर मानले जाते.

आरोग्य तज्ज्ञ निशांत गुप्ता यांच्या मते, आपल्याकडे उपलब्ध असलेले सर्व खाद्यपदार्थ अमृतसारखे आहेत. कारण त्यांचे सेवन केल्याने तुमच्या शरीरातील आणि मनातील सर्व प्रकारच्या दुर्बलता दूर होतील. चला तर सर्वोत्तम फूड कॉम्बिनेशनबद्दल जाणून घेऊया.

6 कॉम्बिनेशन

भात आणि दही

दूध, केळी आणि खजूर

पोळी आणि शुद्ध तूप

ग्रीन टी आणि लिंबू

हळदीचे दूध आणि काळी मिरी

उकडलेले हरभरे आणि टॉमॅटो

दही भात खाण्याचे फायदे

भातातून आपल्याला फायबर, प्रथिने, कर्बोदके मिळतात. त्यासोबत दही खाल्ल्याने कॅल्शियम, जीवनसत्त्वे, प्रोबायोटिक्स, फॉस्फरस, रिबोफ्लेविन इ. सर्व गोष्टी एकत्रितपणे स्नायू, हाडे आणि मेंदूला आवश्यक पोषण देण्यासाठी कार्य करतात.

हळदीचे दूध आणि काळी मिरी यांचे फायदे

हळद आणि काळी मिरी दोन्ही अँटीमाइक्रोबियल गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. याच्या सेवनाने खोकला आणि सर्दीपासून आराम मिळतो आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्यामुळे भविष्यात आजारांचा धोकाही कमी होतो.

वेगवेगळ्या पदार्थांचा आहार घेऊ नका

आयुर्वेदात प्रतिकूल पदार्थ खाण्यास मनाई आहे. कोणतेही पदार्थ एकत्र दार्थ खाऊ नयेत. थंड पदार्थासोबत गरम, आंबट पदार्थासोबत गोड असे पदार्थ खाल्ल्याने पोटाचा त्रास आणि ऍलर्जी होऊ शकते.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Edited By: Sakshi Jadhav

Exit poll : महाराष्ट्रात कोणाची सत्ता येणार? सट्टा बाजाराचे वारे कोणाच्या बाजूने?

Maharashtra Exit Poll: श्रीगोंदा मतदारसंघातून विक्रम पाचपुते होणार आमदार? पाहा Exit Poll

Solapur News : मतदानाच्या दिवशी फटाके फोडणे पडले महागात; सोलापुरात सात जणांविरोधात गुन्हा दाखल

Ulhasnagar Crime : भयंकर! खेळता खेळता भाचीला धक्का दिला, जीवच गेला, नंतर मामाने नात्याची हद्द पार केली!

Maharashtra Exit Poll 2024 : चंद्रकांत पाटलांना कोथरुडकर पुन्हा आमदार करणार का? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

SCROLL FOR NEXT