Gallbladder Stone Saam TV
लाईफस्टाईल

Gallbladder Stone : पित्त खड्यांमुळे होऊ शकतो कर्करोग; वेदना कायमच्या दूर करण्यासाठी ५ रामबाण उपाय

Home Remedies For Gallbladder Stone : पित्त खड्यांवर वेळीच उपचार न केल्यास हा त्रास थेट कर्करोगापर्यंत पोहचतो. त्यामुळे तुम्हाला देखील पित्त खड्यांचा त्रास असेल तर आजपासूनच हा रामबाण उपाय सुरू करा.

Ruchika Jadhav

किडनी स्टोनप्रमाणेच अनेक व्यक्तींना पित्त खड्यांच्या समस्या देखील वाढल्या आहेत. पित्त खड्यांवर वेळीच उपचार न केल्यास हा त्रास थेट कर्करोगापर्यंत पोहचतो, अशी माहिती सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनच्या अहवालात देण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला देखील पित्त खड्यांचा त्रास असेल तर आजपासूनच हा रामबाण उपाय सुरू करा.

पित्ताचे खडे फार घातक असतात. पित्त खडे झाल्यावर व्यक्तींच्या मळमळ, उलट्या, गॅसच्या समस्या, पोट फुगणे अशा अनेक अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अशा समस्यांवर मात करण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही रामबाण उपाय आनले आहेत. अगदी घरच्याघरी हे उपाय करुन तुमचं आरोग्य सुधारू शकतं.

हळदीचा चहा

तुम्ही दूधाचा चहा किंवा ग्री टी हमखास पित असाल. मात्र तुम्हाला पित्ताच्या खड्यांची समस्या असेल तर एक हळकुंड पाण्यात उकळवून घ्या. हळकुंड उकळवून घेतल्यानंतर हे पाणी गाळून कोमट करून प्या. हळदीमधील अँटीऑक्सिडंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्मामुळे तुमच्या पोटातील पित्ताचा खडा फुटून तो शरीरातून बाहेर जाण्यास मदत होईल.

सफरचंद व्हिनेगर

पित्ताचे खडे झाल्यने पोट दुखत असेल, गॅस आणि अपचनाच्या समस्या जास्त प्रमाणात वाढल्या असतील तर एक चमचा अॅपल व्हिनेगर प्या. हे व्हिनेगर पाण्यात मिक्स करून प्यावे. किमान ८ दिवस असे केल्याने पित्ताचा खडा पडून जाण्याची शक्यता आहे.

नाशपती

नाशपती या फळामध्ये पेक्टिन आणि विविध गुणधर्म आहेत. त्यामुळे पित्ताचे खडे फुटून जातात. आठवड्यातून एकदा किंवा दोनवेळा नाशपती फळाचे सेवन करावे.

पपीई

पित्ताचे खडे झाल्यास ऑपरेशन करण्याचा पर्याय असतो. मात्र ऑपरेशन करण्यापेक्षा पपई खाल्ल्याने यातील एन्झाइम पित्ताचा दगड विरघळवण्यास मदत करतो. त्यामुळे कोणत्याही शस्त्रक्रियेशिवाय तुम्हाला बरं वाटू शकतं.

पुदीना

पुदीना विविध पद्धतीने आरोग्यासाठी गुणकारी आहे. पुदीन्यात टेरपीन नावाचं संयुग आहे. तु्म्ही पुदीन्याची पाने धुवून खाऊ शकता किंवा त्याचा ज्यूस करून सेवन करू शकता. त्यामुळे पोटाच्या अन्य समस्येसह पित्त खडे पडून जातात.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही. तुम्हाला पित्त खड्यांचा त्रास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने देखील उपचार घेऊ शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मालवण येथे बेपत्ता मच्छीमाराचा मृतदेह 18 तासानंतर सापडला

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

Cooking Tips : जेवणात जास्त गरम मसाला गेल्यास काय करावे?

बेळगावात मराठी कुटुंबानं उचललं टोकाचं पाऊल; विष प्राशन करून तिघांनी आयुष्य संपवलं, एकीची प्रकृती गंभीर | Belgaum

Ambernath : लिफ्टमध्ये एकटा दिसला, बिल्डिंगमधील व्यक्तीचा 12 वर्षीय मुलावर हल्ला; हातालाही चावला, अंबरनाथमध्ये खळबळ VIDEO

SCROLL FOR NEXT