Signs of Kidney Fail  Saam Tv
लाईफस्टाईल

Kidney Cancer: किडनी कॅन्सरवेळी सुरुवातीला शरीर देतं 'हे' संकेत; रात्रीच्या वेळेस जाणवतील अचानक बदल

Kidney Cancer Symptoms: किडनीच्या कॅन्सरबाबत लोकांना फारशी माहिती नसते. किडनीमध्येही कॅन्सर होऊ शकतो. यामध्ये किडनीच्या पेशींमध्ये हा कॅन्सर सुरु होते आणि हळूहळू शरीराच्या इतर भागातही पोहोचू शकतो.

Surabhi Jayashree Jagdish

कॅन्सर या आजाराचं नाव जरी काढलं तरी आपल्या पायाखालची जमीन सरकते. कर्करोग शरीराच्या कोणत्याही भागात पसरू शकतो. अनेकदा तुम्ही ब्रेस्ट कॅन्सर, घशाचा कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर याबद्दल ऐकलं असेल. पण किडनीच्या कॅन्सरबाबत लोकांना फारशी माहिती नसते. किडनीमध्येही कॅन्सर होऊ शकतो. यामध्ये किडनीच्या पेशींमध्ये हा कॅन्सर सुरु होते आणि हळूहळू शरीराच्या इतर भागातही पोहोचू शकतो.

रेनल सेल कार्सिनोमा हा किडनीच्या कॅन्सरचा सर्वात सामान्य प्रकार आहे. किडनीच्या कॅन्सरवर वेळेवर उपचार करणं खूप महत्वाचं आहे. हा नियंत्रणाबाहेर गेला तर रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. मात्र शरीर तुम्हाला या कॅन्सरचे संकेत देतात. तुम्ही ही लक्षणं ओळखली पाहिजेत. जाणून घेऊया या कॅन्सरची कोणती लक्षणं दिसून येतात.

लघवीतून रक्तस्राव होणं

लघवीतून रक्तस्राव होणं हे किडनी कॅन्सरचं सुरुवातीच्या टप्प्याचे सामान्य लक्षण असू शकते. जर तुम्हाला लघवीमध्ये रक्त येत असेल तर याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. किडनीचा कॅन्सर झाल्यास लघवीला दुर्गंधी येऊ शकते. य़ाशिवाय लघवीमध्ये फेस देखील दिसू शकतो.

भूक न लागणं

तुम्हाला अनेकदा भूक लागत असेल तर त्याला सामान्य समजू नका. कारण हे देखील सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकत. लघवीत रक्त येण्यासोबतच भूक कमी होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

कंबरेत वेदना होणं

मूत्रपिंड हे पोटाच्या मागे असल्याने किडनीचा कॅन्सर झाल्यास कंबरेत तीव्र वेदना होऊ लागतात. तीव्र पाठदुखी हे सुरुवातीच्या टप्प्यातील किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. यामुळे कंबरेमध्ये तीव्र वेदना होऊ शकतात. जर तुम्हाला सतत या वेदना जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वजन अचानक कमी होणं

अचानक वजन कमी होत असेल तर किडनीच्या कॅन्सरचं लक्षण असू शकतं. किडनीच्या कॅन्सरच्या सुरुवातीच्या टप्प्यात रुग्णाचं वजन कमी होऊ शकतं. इतर अनेक कारणांमुळे वजन कमी होऊ शकतं. खरं कारण शोधण्यासाठी किडनीच्या कॅन्सरसंबंधी चाचणी करणं आवश्यक आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन हेकडी काढेन'; 'या' खासदाराचं राज ठाकरेंना आव्हान | VIDEO

Ashadhi Wari : लंडनमध्ये हरिनामाचा जयघोष; २२ देशातून १८ हजार किलोमीटरचा प्रवास, पंढरीची वारी पोहोचली लंडनला

Moong Dal Paratha Recipe : पावसाळ्यात खा गरमा गरम अन् मऊ लुसलुशीत मूग डाळ पराठा

Accident News : सून घरी येण्याचा आईला आनंद, नजर उतरवून लेकराला पाठवलं; भीषण अपघातात नवरदेवासह ८ जणांचा अंत

Maharashtra Live News Update: 22 देशातून 18 हजार किलोमीटरचा प्रवास 70 दिवसात करत पंढरीची वारी पोहोचली लंडनला

SCROLL FOR NEXT