Body Warning Signs google
लाईफस्टाईल

Early Signs of Infection: संसर्गाची सुरुवात कशी ओळखता येते? ही ५ लक्षणं दुर्लक्षित करणं पडेल महागात

Body Warning Signs: शरीरात होणाऱ्या संसर्गाची सुरुवात अनेकदा सौम्य लक्षणांपासून होते. थकवा, हलका ताप, अंगदुखी याकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार आवश्यक आहेत.

Sakshi Sunil Jadhav

जेव्हा शरीरामध्ये संसर्ग होतो तेव्हा आतल्या आत एक शांत लढाई सुरु असते. यावर शरीर कधीकधी मात करतं पण याचा आपल्याला काहीच पत्ता लागत नाही. पण काही वेळा संसर्गाची सुरुवात खूप साध्या लक्षणांपासून होत असते. जसं की, आपण कमी काम करून खूप थकतो, आपल्याला ताण येतो किंवा हवामान बदल यामुळे झाल्याचं समजून दुर्लक्ष करतो. मात्र हीच लक्षणं शरीराकडून दिला जाणारा इशारा असू शकतात.

अचानक सतत थकवा जाणवणं, अंगात शक्ती नसल्यासारखं वाटणं किंवा सुस्ती येणं हे फक्त झोपेअभावी होतं असं नाही. शरीर जेव्हा संसर्गाशी लढत असतं, तेव्हा मोठ्या प्रमाणात ऊर्जा इम्युन सिस्टीममध्ये खर्च होते.

हलका ताप, अंगावर वारंवार शहारे येणं किंवा रात्री झोपेत घाम येणं ही लक्षणं बऱ्याचदा गंभीर वाटत नाहीत. मोठा ताप नसल्यामुळे लोक पेनकिलर घेऊन त्याकडे दुर्लक्ष करतात. पण कारण नसताना असे बदल अनेक दिवस टिकून राहिले, तर ते संसर्गाची सुरुवात असू शकते आणि डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरू शकतं.

कधी कधी शरीरात कुठेही ठोस कारण नसताना दुखणं, स्नायूंमध्ये ताण जाणवणं किंवा सांध्यांमध्ये हलकी वेदना होणंही संसर्गाचं लक्षण असू शकतं. ही वेदना सूजेमुळे येते, मात्र ती अनेकदा कामाचा ताण किंवा थकवा म्हणून दुर्लक्षित केली जाते.

भूक न लागणं, पोटात मुरडा येणं, हलकी मळमळ किंवा जुलाब होणं हे फक्त अपचनाचं लक्षण असंच नाही. अनेक वेळा आतड्यांमधील संसर्ग किंवा शरीरात सुरू असलेल्या लढ्याचा परिणाम पचनसंस्थेवर दिसून येतो.

नाक बंद राहणं, हलकी खोकला, घशात खवखव किंवा श्वास घेण्यात थोडासा बदल जाणवणं सुरुवातीला साध्या सर्दीसारखं वाटतं. मान किंवा कंबरजवळील लिम्फ नोड्स सूजणं म्हणजे शरीर संरक्षणासाठी जास्त प्रमाणात इम्युन सेल्स तयार करत असल्याचं लक्षण असतं. त्याचप्रमाणे कुठेही दुखापत नसताना त्वचेवर लालसरपणा किंवा उष्णता जाणवणंही संसर्गाकडे इशारा करू शकतं. ही लक्षणं लहान वाटली तरी ती महत्त्वाची असतात.

याशिवाय मूड सतत बिघडणं, चिडचिड वाढणं, डोकं जड वाटणं किंवा लक्ष केंद्रित न होणं यालाही फक्त मानसिक ताण समजून चालणार नाही. शरीरात चालू असलेल्या संसर्गाचा परिणाम मेंदूच्या कार्यक्षमतेवरही होतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनपा निवडणुकीनंतर राज्यभर दौरा करणार-सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

Marathi Serial: आजारी वडिलांना भेटणं निर्लज्जपणा आहे? मालिकेवर प्रेक्षकांचा संताप! म्हणाले, 'काय आदर्श घ्यायचा प्रेक्षकांनी...'

Maharashtra Politics: दे धक्का! अजितदादांचं भाजपला जशास तसे उत्तर; 'किंगमेकर' नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

राहुल गांधी, सोनिया गांधींना मोठा झटका; नॅशनल हेराल्ड प्रकरणी ED च्या याचिकेवर दिल्ली हायकोर्टाची नोटीस

विजयी मिरवणुकीत राडा; कारवर फटाके फोडण्याला विरोध केला, भाजप नगरसेवकाच्या कार्यकर्त्यांकडून २ महिलांना मारहाण

SCROLL FOR NEXT