Colon Cancer google
लाईफस्टाईल

Colon Cancer: कमी वयातच कोलन कॅन्सरचा धोका, ही ४ लक्षणं दुर्लक्षित करूच नका; वाचा डॉक्टरांचा सल्ला

Colorectal Cancer Symptoms: 30 ते 40 गटातील तरुणांमध्ये कोलन कॅन्सरच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत. त्यामध्ये अत्यंत सामान्य वाटणारी लक्षणे सुद्धा आढळतात.

Sakshi Sunil Jadhav

सध्या तरुणांच्या खाण्यापिण्याच्या जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होताना पाहायला मिळतायेत. घरचं अन्न नाहीतर जंक फूड हा त्यांच्या आवडीचा आहार बनला आहे. पण ते अन्न पोटाला पचत नाही. मग न कळत पोटाच्या समस्या वाढत जातात आणि भविष्यात मोठ्या जीवघेण्या आजाराला सामोरं जावं लागतं.

पुढील बातमीत तज्ज्ञांनी ४ लक्षणांबद्दल माहिती दिली आहे. विशेष म्हणजे ही लक्षणं तरुणांना मोठ्या प्रमाणात जाणवतात. त्या आजाराचं नाव म्हणजे कोलन कॅन्सर आहे. कोलन कॅन्सर हा मोठ्या आतड्यात होणारा कॅन्सर आहे. तो पचनसंस्थशी संबधित एक गंभीर आजार मानला जातो. जो ३० ते ४० वयोगटातल्या तरुणांमध्ये वाढत चालला आहे.

कोलन कॅन्सरची लक्षणे कोणती?

1. घाम येणे.

उन्हाळ्यात घाम येणे ही एक सामान्य समस्या मानली जाते. पण झोपेत अचानक घाम येणं आणि सतत ही समस्या जाणवणं. तसेच ताप किंवा वजन कमी होणं अशी लक्षणं दिसणं ही कोलन कॅन्सरची सुरुवातीची लक्षणं असू शकतात.

2. शौचातून रक्त येणे.

सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे शौचातून रक्त येणे. हे कॅन्सरचे गंभीर लक्षण आहे. काही वेळा मूळव्याधेमुळेही रक्त येतं, पण वारंवार रक्तस्राव होत असेल तर तपासणी करणं महत्वाचं आहे.

3. बद्धकोष्ठतेचा त्रास किंवा जुलाब होणे.

अचानक बद्धकोष्ठतेचा त्रास किंवा खूप दिवस जुलाब होणं ही लक्षणंही धोकादायक ठरू शकतात. काही आठवड्यांपेक्षा जास्त काळ पोट साफ होण्यात बदल जाणवत असेल, शौचाची पट्टी पातळ होत असेल किंवा सतत टॉयलेटला जाण्याची भावना होत असेल तर तातडीने तपासणी करून घ्यावी.

4. थकवा जाणवणे.

नेहमीपेक्षा जास्त थकवा जाणवणं, सतत झोप येणं किंवा अशक्तपणा वाटणं हे सुद्धा कोलन कॅन्सरमुळे होऊ शकतं. कॅन्सरमुळे शरीरात हळूहळू रक्तस्राव होऊन हिमोग्लोबिन कमी होते आणि त्यामुळे शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. त्याने व्यक्ती सतत थकलेली वाटू शकते.

टीप : ही माहिती केवळ जनजागृतीसाठी असून वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पक्षात वेळोवेळी निवडणुका झाल्या पाहिजेत: शिंदे गट

Kalyan - Dombivli Politics : भाजप-शिंदेसेना महायुती तुटणार? मनसेवरून मिठाचा खडा; संघर्ष चिघळण्याची शक्यता

Shiv Thackeray: टीव्हीनंतर आता मोठ्या पडद्यावर शिव ठाकरेची एंट्री; 'रक्तनीती'मधून करणार मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री

Test Ranking : कसोटी रँकिंगमध्ये मोठा उलटफेर; खराब कामगिरीचा भारताच्या फलंदाजाला फटका, टॉप १० मध्ये कोण?

Amit Thackrey : “मोदींचे नेतृत्व मान्य नसेल तर पाकिस्तानात जा!; अमित ठाकरेंवर शिंदेसेनेचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT