Insulin resistance symptoms saam tv
लाईफस्टाईल

Insulin resistance: सतत भूक लागतेय, थकवा येतोय? डायबेटीजचं सुरुवातीची लक्षणं असू शकतं, शरीरातील ५ बदलांकडे दुर्लक्ष करू नका!

Insulin resistance symptoms: सतत तहान लागणं, वारंवार लघवी होणं, जास्त भूक लागणं आणि थकवा जाणवणं ही इन्सुलिन रेझिस्टन्सची सुरुवातीची लक्षणं असू शकतात. वेळेत लक्ष दिल्यास टाइप २ मधुमेह आणि हृदयविकाराचा धोका कमी करता येतो.

Surabhi Jayashree Jagdish

सध्या आपली जीवनशैली वेगाने बदलली आहे. या जीवनशैलीमुळे आणि अयोग्य आहारामुळे इन्सुलिन रेजिस्टेंस ही एक गंभीर आरोग्य समस्या पाहायला मिळतेय. इन्सुलिन हार्मोन पेशींमध्ये ग्लुकोज पोहोचवण्यास मदत करतं. यामुळे तुमच्या शरीराला उर्जा मिळते. त्याचप्रमाणे तुमची ब्लड शुगर लेव्हल देखील कंट्रोलमध्ये राहते.

इन्सुलिन रेझिस्टन्स ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये पेशी इन्सुलिन हार्मोनचा योग्य वापर करू शकत नाहीत. जर या स्थितीचं वेळेत निदान झालं नाही तर त्यामुळे टाइप २ मधुमेह, लठ्ठपणा आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका असतो. काही लक्षणं समजून घेतल्यास तुम्हाला इन्सुलिन रेझिस्टन्स ओळखता येतो. ही लक्षणं काय आहेत ते पाहूयात.

सतत तहान लागणं

इन्सुलिन रेझिस्टन्सचं सर्वात सामान्य सुरुवातीचं लक्षण म्हणजे जास्त तहान लागणं. ज्यावेळी पेशी इन्सुलिन वापरू शकत नाहीत तेव्हा रक्तातील साखरेची पातळी वाढते. ही अतिरिक्त साखर काढून टाकण्यासाठी शरीर ऊतींमधून पाणी काढतं. त्यामुळे व्यक्तीला वारंवार तहान लागते.

सतत लघवी होणं

जास्त तहान आणि वारंवार लघवी होणं यांचा संबंध आहे. ज्यावेळी रक्तातील ग्लुकोजची पातळी १८० मिलीग्राम/डेसीएलपेक्षा जास्त वाढते तेव्हा किडनी ते फिल्टर करण्यासाठी जास्त मेहनत घेते. यामध्ये शरीरातील भरपूर द्रवपदार्थ लघवीच्या स्वरूपात बाहेर पडतात. जर तुम्हाला रात्री वारंवार लघवीला जावं लागत असेल तर ते इन्सुलिन रेझिस्टन्सचं लक्षण असू शकतं.

स्त भूक लागणं

पोटभर जेवण केल्यानंतर लगेचच तुम्हाला पुन्हा भूक लागते का? जर असेल तर हे इन्सुलिन रेझिस्टन्सचं लक्षण असू शकतं. यामध्ये तुमच्या रक्तात भरपूर साखर असली तरी ती पेशींपर्यंत पोहोचू शकत नाही. यामुळे शरीराची ऊर्जा कमी होते आणि मेंदू वारंवार भूकेचे संकेत पाठवतो. यामुळे सतत खाण्याची इच्छा होते.

जास्त थकणं

ग्लुकोज हा शरीराचा मुख्य ऊर्जेचा स्रोत आहे. ज्यावेळी तुमच्या शरीरात इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतं तेव्हा ग्लुकोज पेशींमध्ये प्रवेश करू शकत नाही. यामुळे शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला आराम करून देखील थकायला होतं.

धुसर दिसणं

रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने तुमच्या डोळ्याच्या आकारावर परिणाम होऊ शकतो. ज्यावेळी रक्तातील साखरेची पातळी खूप जास्त वाढते तेव्हा लेन्सचा आकार बदलू शकतो आणि दृष्टी धुसर होऊ शकते. हे कायमचं नसलं तरी तुमचे चयापचय योग्यरित्या काम करत नसल्याचं हे एक गंभीर लक्षण आहे.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT