What Causes Early Puberty saam tv
लाईफस्टाईल

Early Puberty: 9 ते 10 वर्षांच्या मुलींना का येतेय मासिक पाळी? जाणून घ्या यामागील मुख्य कारणं

What Causes Early Puberty: लहान वयात मुलींना मासिक पाळी सुरू होणं हे त्यांच्या आरोग्यासाठी काहीशा चिंतेचं कारण ठरू शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे. यामागची कारणं आहेत ते जाणून घेऊया.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मासिक पाळी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मुळात कोणत्याही महिलेला मासिक पाळी येणं ही तिच्या चांगल्या आरोग्यासाठी गरजेचं असतं. मुलींना पहिल्यांदा पिरीयड्स १३ ते १४ या वयोगटामध्ये येतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, मासिक पाळी येण्यासाठी हेच वय योग्य आहे. मात्र आजच्या काळात अनेक मुलींना ९ ते १० वयातच मासिक पाळी येऊ लागल्याचं दिसून येतंय.

मात्र तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, लवकर वयात मासिक पाळी येणं हे मुलींच्या आरोग्यासाठी काही प्रमाणात धोकादायक ठरू शकतं. या गोष्टींमागे काय कारणं आहेत हे तज्ज्ञांनी आपल्याला स्पष्ट केलं आहे.

स्त्रिरोग आणि वंधत्व निवारण तज्ज्ञ डॉ. हितेंद्रसिंग राजपूत यांनी सांगितलं की, Precocious puberty, हार्मोनल असंतुलन, लाईफस्टाईलमधील बदल तसंच जंक फूडचं अतिप्रमाणातील सेवन यामुळे मुलींना फार लवकर मासिक पाळी येण्याची समस्या जाणवते. कमी वयात मासिक पाळी येण्यासाठी मानसिकरित्या तयार नसल्याने मुली त्या डिस्टर्ब होऊ शकतात. याचा परिणाम मुलींच्या उंचीवरही होऊ शकतो. मुलींची उंची कमी राहू शकते.

फिजीकली एक्टिव्ह न राहणं

आजच्या चुकीच्या जीवनशैलीत, जास्त वेळ अंथरुणावर पडून राहणं, व्यायाम न करणं, मोबाईल फोनचा जास्त वापर केल्याने शरीरातील चयापचय बिघडू शकते. परिणामी मासिक पाळी लवकर येऊ शकते.

ताण

लहान मुलांमध्ये सध्या ताणाचं प्रमाण अधिक आहे. मुली अभ्यासाचं देखील टेन्शन घेतात. जास्त तणावामुळे कमी वयात मुलींना मासिक पाळी येऊव शकते.

चुकीचा आहार

अधिकतर मुलं फास्ट फूड, जंक फूड, तळलेले, प्रोसेस्ड फूड जास्त प्रमाणात खातात. या पदार्थांच्या अधिक सेवनामुळे कमी वयात पिरीयड्स येण्याचा धोका असतो.

हार्मोन असंतुलन

महिलांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होत असतात. यामुळे मुलींना लवकर पिरीयड्स येण्याची तक्रार असू शकते.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. आम्ही याचं समर्थन अथवा दावा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच घ्यावीत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT