Earbuds Cleaning Hacks Saam Tv
लाईफस्टाईल

Earbuds Cleaning Hacks : सावधान ! इअरबर्ड्समुळे कानांना होऊ शकते इन्फेक्शन, कसे कराल साफ ? जाणून घ्या

Earbuds Using Tips : हल्ली 10 पैकी 8 जणांच्या कानात इअरबर्ड्स सहज पाहायला मिळतात.

कोमल दामुद्रे

Earbuds Cleaning Tips : सध्याच्या काळात प्रवास करताना किंवा आपल्या माणसांशी बोलताना सगळ्याच्या कानांत सहज पाहायला मिळतात ते इअरबर्ड्स. इअरबर्ड्स हे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भागच बनला आहे जणू. हल्ली 10 पैकी 8 जणांच्या कानात इअरबर्ड्स सहज पाहायला मिळतात.

पण तुम्हाला माहित आहे का? की इअरबर्ड्सवरील घाणीमुळे आपल्या कानांत अनेक जिवाणू जाऊ शकतात आणि त्यामुळे इन्फेक्शन (Infection) होऊ शकते. तुम्ही देखील रोज हेडफोन्स किंवा इअरबर्ड्स वापरत असाल तर त्याची काळजी (Care) कशी कराल हे जाणून घेऊया.

इअरबर्ड्स सततच्या वापराने कानात मेणासारखी घाण आणि धूळ जमा होते. अशात त्याची योग्य निगा न राखल्यास कानाच्या आत इन्फेक्शनचा धोका निर्माण होऊ शकतो. ज्यामुळे आपल्याला अनेक गंभीर आजारांना (Disease) सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे इअरबर्ड्स वेळोवेळी स्वच्छ करूनच वापरले पाहिजे. हे इअरबर्ड्स घरच्या घरी कसे साफ कराल जाणून घेऊया

1. इअरबर्ड्सना किती वेळा स्वच्छ केले पाहिजेच?

जर आपण दररोज इअरबर्ड्स वापरत असाल तर कमीत कमी आठवड्यातून एक वेळा इअरबर्ड्सना स्वच्छ करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला उन्हाळ्यात जास्त घाम येत असेल तर चार दिवसांनी स्वच्छ करणे फायद्याचे ठरेल.

2. इअरबर्ड्सना घरी स्वच्छ कसे करावेत?

साहित्यः

  • डिशवॉशिंग लिक्विड

  • छोटी वाटी

  • कापूस/ स्पंज

  • टूथब्रश

  • मायक्रोफायबर कापड

3. कसे कराल साफ ?

  • एका छोट्या वाटीत 1/4 चमचा डिशवॉशिंग लिक्विडला 1/2 कप गरम पाण्यात मिसळा.

  • इअरबर्ड्समधून फोम अणि सिलिकॉन टिप्स काढून त्यांना तयार केलेल्या मिश्रणात 30 मिनिटांसाठी ठेवा.

  • आता सिलिकॉन कॅपला मिश्रणातून काढून सूकवा.

  • इअरबर्ड्सच्या उघड्या कोपऱ्यात अडकलेली घाण कापसाच्या गोळ्याने स्वच्छ पुसून घ्या.

  • यानंतर त्यांना गरम पाण्याने धुवून घ्या आणि एका लिंट फ्री कापडावर हवेने सुखवा.

  • इअरबर्ड्सवर लावलेल्या मेश कव्हरला खालच्या बाजूला पकडून स्वच्छ करा जेणे करून घाण बाहेरील हाउसिंगमध्ये पडणार नाही.

  • यानंतर त्याला एका नरम, सुक्या टुथब्रशने हळुहळु स्वच्छ करा.

4. इअरबर्ड्सना जास्त काळासाठी स्वच्छ कसे ठेवावे?

जेव्हा तुम्ही इअरबर्ड्सना आपल्या बॅगपॅक, पर्स, किंवा खिशात ठेवता तेव्हा त्यांच्यावर धुळ, लिंट आणि जिवाणू जमा होतात. त्यामुळे त्यांना नेहमी कव्हर मध्ये ठेवावे. याशिवाय इअरबर्ड्स भिजल्यावर त्यांना हवेत सुकवा. आपल्या इअरबर्ड्सना घामाच्या कपड्यांपासून दूर ठेवावे. जेव्हा तुम्ही त्यांचा वापर करत नसाल तेव्हा त्यांना त्यांच्या केसमध्ये किंवा प्लास्टिक बॅगेत व्यवस्थित ठेवावे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी मी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे योद्धे कुठं होते? २६/११ च्या हल्ल्यातील हिरोचा राज ठाकरेंना सवाल

Rat Bite: पावसाच्या पाण्यातून चालताना उंदिर चावला? ही खबरदारी घ्या

Shirpur News : झोपेतच काळाचा घाला; घराचे छत कोसळले, छताखाली दबून वृद्धेचा मृत्यू, नातू व आजोबा गंभीर

Maharashtra Live News Update: शिर्डी माझे पंढरपूर! आषाढी निमित्ताने शिर्डीत साई भक्तांची मांदियाळी

Ashadh Wari: जांभळावर साकारला विठ्ठल! चांदवडच्या शिक्षकाची भक्ती आणि पर्यावरणाचा संदेश देणारी आगळीवेगळी कलाकृती|VIDEO

SCROLL FOR NEXT