Dussehra 2022 Saam tv
लाईफस्टाईल

Dussehra 2022: भारतातील या ठिकाणी दसऱ्याला केली जाते रावणाची पूजा, कुठे आहेत ही मंदिरे?

Ravan Temple In India : विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतातील या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी पूजा केली जाते. जाणून घेऊया मंदिरांबद्दल

कोमल दामुद्रे

Ravan Puja In India :

आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दशमीला विजयादशमी साजरी केली जाते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसरा यंदा २४ ऑक्टोबरला साजरा केला जाईल. विजयादशमी हा सण भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. याला दसरा, दशहरा आणि दशैन या नावानेही ओळखले जाते.

दसऱ्याच्या दिवशी भगवान श्रीरामांनी लंकापती रावणाचा वध केला होता. श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. रावण हा भगवान शंकराचा भक्त होता. त्याला हजारो वर्ष जगण्याचे अर्थात अमर राहाण्याचे वरदान मिळाले होते. रावणाला महाऋषी म्हणून देखील ओळखले जाते. परंतु, सीतेचे अपहरण केल्यानंतर दहा डोक्यांचा हा रावण राक्षस म्हणून ओळखला जाऊ लागला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दसऱ्याच्या दिवशी भारतातील (India) अनेक ठिकाणी रावणाचा पुतळा जाळला जातो. परंतु भारतात अशी अनेक मंदिरे आहेत जिथे रावणाच दहन नाहीतर त्याचे पूजन केले जाते. विजयादशमीच्या मुहूर्तावर भारतातील या ठिकाणी दसऱ्याच्या दिवशी पूजा (Puja) केली जाते. जाणून घेऊया मंदिरांबद्दल

1. कर्नाटक लंकेश्वर महोत्सव

कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील लंकेश्वर महोत्सव आयोजित केला जातो. या उत्सवात रावणाची पूजा करुन मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत लंकेचा राजा रावणासोबत भगवान शंकराचीही मिरवणूक काढतात. याशिवाय कोलारच्या मालवल्ली तहसीलमध्ये रावणाचे मंदिर आहे.

2. मध्य प्रदेशातील विदिशा

रावणाची पत्नी मंदोदरीचा जन्म मध्य प्रदेशातील विदिशा येथे झाला. हे स्थान रावणाचे सासर मानले जाते. त्यामुळे या ठिकाणी त्याची पूजा केली जाते. विदिशामध्ये रावणाचा १० फूट उंच पुतळा आहे. या भागात विवाह किंवा इतर कोणत्याही शुभ कार्यात विदिशामध्ये असलेल्या रावणाच्या मूर्तीची पूजा करुन आशीर्वाद घेतला जातो.

3. मध्य प्रदेशातील मंदसौर

भारतातील पहिले रावणाचे मंदिर मध्य प्रदेशात बांधले गेले आहे. येथे मंदसौरमध्ये रुंडी नावाची रावणाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. ज्याची लोक पूजा करतात. महिला बुरखा घालून रावणाच्या मूर्तीसमोर जातात.

4. हिमाचल प्रदेशातील बैजनाथ

हिमाचल प्रदेशातील बैजनाथ शहरातली रावणाची पूजा केली जाते. बैजनाथ नगरात रावणाने भगवान शंकराची (Shiva) कठोर तपश्चर्या केली असे मानले जाते. त्यामुळे येथे रावणाची पूजा केली जाते.

5. उत्तरप्रदेशातील कानपूरमधील दशानन मंदिर

उत्तरप्रदेशातील कानपूर जिल्ह्यात रावणाचे मंदिर आहे. कानपूरच्या शिवाला भागात असलेल्या या मंदिराचे नाव दशानन मंदिर आहे. जे दसऱ्याच्या दिवशी उघडले जाते. येथे तेलाचा दिवा लावून मनोकामना केल्यास मनोकामना पूर्ण होतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : आम्ही शांत आहोत, म्हणजे आम्ही #@$ डू आहे, असा गैरसमज करू नये - राज ठाकरे

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT