Rat Killer Plants Saam TV
लाईफस्टाईल

Rat Killer Plants : उंदीर मारण्यासाठी औषधाची गरज नाही; घरात 'हे' झाड लावल्यास सर्व उंदीर पळून जातील

Rat Not Enter Your House : असं एक झाड आहे जे तुमच्या घरामध्ये लावल्यानंतर उंदरांचा नायनाट होतो. हे झाड तुमच्या घरात असल्यास उंदीर घराकडे फिरकत देखील नाहीत.

Ruchika Jadhav

घरामध्ये एक उंदीर सापडला की पुढच्या आठवडाभरात उंदरांचा सुळसुळाट होतो. घरामध्ये एक उंदीर आला तरी तो सर्व सामानाची नासधूस करतो. त्यामुळे काही पदार्थ किंवा फळं आणि भाज्या उघड्यावर देखील ठेवता येत नाहीत. त्यामुळे उंदरांना पळवून लावण्यासाठी तुम्ही देखील मोठी शक्कल लढवत असाल.

घरात असताना समोर उंदीर आल्यास अनेक व्यक्ती झाडू घेऊन त्याच्या मागे लागतात. मात्र उंदीर आपली पाठ सोडत नाही समजल्यावर वैतागून तुम्ही देखील घरी रॅट किलर आणलं असेल. उंदीर मारण्याचं औषध तसेच काही व्यक्ती उंदरांना पकडण्यासाठी पिंजरा आणतात. बाजारात उंदीर मारण्यासाठी एक चिकट गम असलेला पुठ्ठा देखील मिळतो. उंदीर घालवण्यासाठी तुम्ही देखील असे विविध प्रयोग आजवर केले असतील.

मात्र तुम्हाला माहिती आहे का? असं एक झाड आहे जे तुमच्या घरामध्ये लावल्यानंतर उंदरांचा नायनाट होतो. हे झाड तुमच्या घरात असल्यास उंदीर घराकडे फिरकत देखील नाहीत.

लॅव्हेंडर

घरामध्ये सुगंधी आणि मनमोहक वातावरण तयार करण्यासाठी अनेक व्यक्ती लॅव्हेंडरचा वापर करतात. लॅव्हेंडरच्या मुलांचा सुगंद घर अगदी प्रसन्न ठेवतो. माणसांना आवडणारा हा सुगंध उंदरांना मात्र अजिबात आवडत नाही. जेथे हा सुगंध येतो तेथे उंदीर अजिबात येत नाहीत. त्यामुळे तुम्ही घरामध्ये लॅव्हेंडर लावून उंदरांपासून कायमची सुटका मिळवू शकता.

गवती चहा

गवती चहा आपण आपल्या चहामध्ये हमखास वापरतो. त्याचा सुगंध अनेकांना आवडतो. या सुगंधामुळे चहाची चव देखील वाढते. मात्र हाच गंध उंदरांना आवडत नाही. त्यामुळे उंदीर पकडण्याठी त्यांना मारण्यासाठी मोठा खटाटोप करण्यापेक्षा तुम्ही देखील तुमच्या घरी ही झाडे लावू शकता. त्याने एकही उंदीर तुमच्या घरात प्रवेश करणार नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT