Bottle Gourd Halwa Recipe Saam TV
लाईफस्टाईल

Bottle Gourd Halwa Recipe: यम्मी! दुधीभोपळ्याचा हलवा; एकदा खाल तर खातच रहाल, वाचा रेसिपी

Dudhi Halwa Recipe In Marathi: प्रोटीनमुळे अनेक घरांमध्ये ही भाजी बनवली जाते. मात्र तुम्ही दुधीभोपळ्यापासून बनवलेला हलवा कधी खाल्ला आहे का? आज याचीच रेसिपी जाणून घेणार आहोत.

Ruchika Jadhav

दुधीभोपळा बाजारात सध्या मोठ्याप्रमाणावर विक्रीसाठी आला आहे. दुधीभोपळापासून विविध पदार्थ बनवले जातात. आता यापासून बनलेली भाजी तुम्ही नक्कीच खाल्ली असेल. यामध्ये असलेल्या प्रोटीनमुळे अनेक घरांमध्ये ही भाजी बनवली जाते. मात्र तुम्ही दुधीभोपळ्यापासून बनवलेला हलवा कधी खाल्ला आहे का? आज याचीच रेसिपी जाणून घेणार आहोत.

साहित्य

दुधीभोपळा - 1 किलो

बदाम - 10 पिस

काजू - 10 पिस

फुल क्रीम दूध - 2 कप

मावा - 250 ग्राम

साखर - 350 ग्राम

वेलची - 5 पाकळ्या

तूप - 50 ग्राम

कृती

दुधीभोपळ्यापासून हलवा बनवताना सुरुवातीला भोपळा किसणीवर किसून घ्या. त्यानंतर तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर साखर आधी मिक्सरला बारीक करून घ्या. गॅस वर एक कढई ठेवा. या कढईमध्ये सुरुवातीला थोडे तूप टाकून घ्या. त्यानंतर काजू आणि बदामचे काप करून ते फ्राय करून घ्या.

पुढे हे काप कढईमधून काढून घ्या. त्यानंतर उरलेलं तूप टाकून घ्या. पुढे यामध्ये बारीक किसलेला दुधीभोपळा मिक्स करा. भोपळा सुरुवातीला चांगला शिजवून घ्या. त्यानंतर यामध्ये साखर वेलची पूड, मावा आणि फुल क्रीम दूध मिक्स करा. पुढे हे सर्व मिश्रण एकत्र करून एक वाफ काढून घ्या. तयार झाला तुमचा दुधीभोपळ्याचा हलवा.

लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा हलवा सर्वांना आवडतो. घरी पाहुणे आल्यावर देखील तुम्ही अशा पद्धतीने स्वीट डिश बनवू शकता. दुधीभोपळ्यात जास्त प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शिअम असते. त्यामुळे आरोग्यासाठी दुधीभोपळ्याचे पदार्थ चांगले असतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagarparishad Election: बारामती, फलटण, अंबरनाथसह २३ नगरपरिषद- नगरपंचायतीसाठी आज मतदान, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; उद्या निकाल

Maharashtra Live News Update : अंबरनाथ मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप

Municipal Election : अंबरनाथमध्ये शिंदेंचे बोगस मतदार, मंगल कार्यालयात शेकडो महिला आढळल्या, भाजप-काँग्रेसचा आरोप

Pension News : पेन्शनधारकांना केंद्र सरकारचा दिलासा, NPS मधून ८० टक्के रक्कम काढता येणार

२० डिसेंबरपासून नवी सुरुवात! धनु राशीत चंद्राचा प्रभाव; ‘या’ ४ राशींचं नशीब चमकणार

SCROLL FOR NEXT