Driving License  Saam Tv
लाईफस्टाईल

Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही; काय आहे नवा नियम?

Latest News on Driving License Rules: ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची ही सर्व प्रक्रिया आरटीओमार्फत केली जात होती. मात्र आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यांसंबधीची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे.

Manasvi Choudhary

भारतात वाहन चालवण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) असणे आवश्यक आहे. वाहन परिवहन विभागातर्फे ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाते. यासाठी जवळच्या आरटीओमध्ये तुम्हाला अर्ज सादर करून लायसन्ससाठी अप्लाय करावे लागते. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज केल्यानंतर लायसन्स हातात मिळेपर्यंत बराच काळ जातो. मात्र आता नव्या नियमानुसार हे लायसन्स तुम्हाला लवकर मिळवता येणार आहे. त्याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

कोणत्याही राज्यात सुरक्षित प्रवास करायचा असल्यास तुमच्याकडे कायदेशीररित्या ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आधी जवळच्या आरटीओमध्ये वाहनाचे सर्व कागदपत्रे आणि अर्ज सादर करावे लागत होते. तसेच ड्रायव्हिंग परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स दिले जात होते. ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची ही सर्व प्रक्रिया आरटीओमार्फत केली जात होती. मात्र आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने यांसंबधीची प्रक्रिया आणखी सोपी केली आहे.

येत्या १ जूनपासून लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला आरटीओमध्ये न जाता तुम्ही घेत असलेल्या ड्रायव्हिंग प्रशिक्षण संस्थामध्ये ड्रायव्हिंग टेस्ट देऊन लायसन्स मिळवू शकता. यासाठी ठरावीक संस्थाना रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने मान्यता दिली आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी नवे नियम काय आहेत?

1) ड्रायव्हिंग करणारा प्रशिक्षक हा किमान १२ वी उत्तीर्ण असावा.

2) ड्रायव्हिंग करत असलेल्या प्रशिक्षकाला पाच वर्षाचा अनुभव असणे महत्वाचे आहे.

3) हलक्या वाहनांसाठी ४ आठवडे प्रशिक्षण देण्यात येईल. तर अवजड वाहनांसाठी ६ आठवडे प्रशिक्षण देण्यात येईल.

4) लायसन्स काढण्यासाठी लागणारा प्रक्रिया काळ कमी करण्यात आला आहे.

5) वाहनाच्या कागदपत्राच्या पडताळणीसाठी https://parivahan.gov.in/. या संकेतस्थळाला भेट द्या.

6) ड्रायव्हिंग टेस्ट आणि कागदपत्रे सादर करण्यासाठी आरटीओत जाण्याची गरज नसल्याचे सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केसांचे नुकसान टाळायचंय? मग 'या' गोष्टी आजपासूनच बंद करा

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT