Drinking water before bed SAAM TV
लाईफस्टाईल

Drinking water before bed: झोपण्याआधी किती तास आधी आणि किती पाणी प्यावं? फायदे-तोटे जाणून घ्या

How drinking water before sleep helps digestion: झोपण्यापूर्वी थोडं पाणी प्यायल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. पचनक्रिया सुधारते, शरीरातील टॉक्सिन बाहेर पडतात आणि त्वचा तसंच हृदयाच्या आरोग्यासाठीही ते उपयुक्त ठरू शकतं.

Surabhi Jayashree Jagdish

आपल्या शरीरासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचं असून पचन प्रक्रिया सुरळीत ठेवणं, शरीराचं तापमान नियंत्रित ठेवणं आणि शरीरातील टॉक्सिन घटक बाहेर टाकणं या अनेक कामांसाठी पाणी आवश्यक असतं. बहुतांश लोक दिवसभर पाणी पिण्याकडे लक्ष देतात, पण झोपण्यापूर्वी थोडं पाणी पिण्याचेही काही खास फायदे असतात. मात्र रात्री योग्य प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे.

नैसर्गिक डिटॉक्स प्रक्रियेला मदत

आपण झोपलो असताना शरीरामध्ये अनेक कामं चालू असतात. आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्याची प्रक्रिया देखील सुरू असते. झोपण्यापूर्वी थोडं पाणी प्यायल्याने किडनीचं काम अधिक सुरळीत होण्यास मदत होते. परिणामी शरीरातील टॉक्सिन पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्यामुळे लिव्हर आणि किडनीचं कार्य योग्य पद्धतीने होतं.

स्नायू आणि सांध्यांसाठी फायदेशीर

शरीरात पाण्याची कमतरता असल्यास स्नायूंच्या समस्या निर्माण होऊ शकतात. दिवसभर काम केल्यानंतर किंवा व्यायाम केल्यानंतर ही समस्या अधिक जाणवते. झोपण्यापूर्वी थोडं पाणी प्यायल्याने स्नायू आणि सांधे चांगले राहतात. अशावेळी रात्री गोळे येण्याचा त्रासही कमी होतो.

पचनक्रिया सुधारते

रात्री झोपण्यापूर्वी थोडं पाणी प्यायल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते. यामुळे शरीराचं तापमानही संतुलित राहतं. उशिरा जेवण केलं असल्यास पचनासाठी शरीराला मदत मिळते.

त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त

त्वचेची चांगली काळजी घेण्यासाठी शरीरात पुरेसं पाणी असणं गरजेचं आहे. झोपण्यापूर्वी पाणी घेतल्याने दिवसभरात कमी झालेली शरीरातील आर्द्रता भरून निघते. त्यामुळे त्वचा कोरडी पडण्याचा त्रास कमी होतो आणि त्वचा अधिक चमकदार राहण्यास मदत होते.

हृदय आणि मेंदूच्या कामासाठी मदत

शरीरात योग्य प्रमाणात पाणी असल्यास रक्ताभिसरण सुरळीत राहतं आणि शरीराच्या प्रत्येक भागापर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते. झोपण्यापूर्वी थोडं पाणी प्यायल्याने रक्तदाब संतुलित ठेवण्यास मदत मिळते. यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिलिंडर तुटवड्यामुळे जळगावतील वरण बट्टी हॉटेल व्यवसायिक चुलीकडे वळले

CBSE 12th Exam: सीबीएसईचा ७ देशांसाठी मोठा निर्णय, १२ वी बोर्डाच्या परीक्षा रद्द

Khaja Recipe: सणासुदीला घरच्या घरी कुरकुरीत आणि गोड खाजा करा तयार, वाचा सोपी रेसिपी

Free Ticket : वंदे भारत-तेजस एक्सप्रेसचा मोफत तिकिटाने प्रवास, चहा-नाश्ता अन् जेवणही फुकटात, वाचा योजना नक्की आहे काय?

Celebrity Mangalsutra Designs: सेलिब्रिटींना घातलेली 5 युनिक मंगळसूत्र, या आहेत ट्रेडिंगच्या डिझाईन्स

SCROLL FOR NEXT