Drinking Warm Water saam tv
लाईफस्टाईल

Drinking Warm Water: खरंय का? गरम पाणी प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो का? तज्ज्ञांनी सांगितले, शरीरात काय बदल होतात?

Health Benefits Of Drinking Warm Water: गरम किंवा कोमट पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. पचन सुधारण्यापासून शरीर हायड्रेट ठेवण्यापर्यंत अनेक फायदे मिळू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

गरम पाणी पिणं हे आपल्या आरोग्यासाठी उत्तम असतं. आजकाल सोशल मीडियावर अनेकजण गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे लोकही गरम पाणी पिण्यावर भर देतात. मानवी शरीरासाठी पाणी हे गरजेचं आहे. सरासरी शरीराच्या वजनाच्या सुमारे 50 ते 65 टक्के भाग पाण्याचा असतो. पुरुषांमध्ये हे प्रमाण साधारण 60 टक्के तर महिलांमध्ये 50 ते 55 टक्के पाहायला मिळू शकतं.

शरीराचं काम योग्यरित्या सुरु ठेवण्यासाठी दररोज सुमारे 2 ते 2.5 लिटर पाणी गरजेचं असतं. पाण्यामुळे तुमच्या शरीराचं तापमान नियंत्रणात राहतं. यामुळे सांध्यांना लुब्रिकेशन मिळतं. शिवाय यामुळे शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. गरम पाणी पिण्याचे काय फायदे आहेत ते पाहूयात.

सकाळी उठल्यावर कोणतंही पेय ठरतं फायदेशीर

अमेरिकेतील The New York Times या पेपरमध्ये नमूद कऱण्यात आलंय की, या विषयावरील अनेक संशोधनांनुसार, शरीर हायड्रेट ठेवणं महत्त्वाचं आहे. NYU Langone Health मधील गॅस्ट्रोएन्टरोलॉजिस्ट डॉ. लिसा गंझू यांच्या मते, कोणत्याही तापमानाचे खाद्यपदार्थ किंवा पेय खाल्लं की अन्ननलिका, पोट आणि आतड्यांमध्ये हालचाल सुरू होण्यास मदत होते. ही हालचाल पाणी, कॉफी, ज्यूस यामुळे होऊ शकते. त्यामुळे मल आणि वायू बाहेर जाण्याची प्रक्रिया सुलभ होते.

बद्धकोष्ठतेवर मदत होण्याची शक्यता

गरम किंवा कोमट पाणी पिण्याचा एक फायदा म्हणजे बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो. डिहायड्रेशन हे बद्धकोष्ठतेचं एक प्रमुख कारण असू शकतं. त्यामुळे पुरेसे पाणी प्यायल्यास शौचाचा त्रास होत नाही.

अॅकलेशिया या आजारात काहीसा फायदा मिळतो

गरम पाणी प्यायल्यामुळे अॅकलेशिया नावाच्या दुर्मिळ अन्ननलिकेच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांना काहीसा आराम मिळू शकतो. या आजारात अन्न गिळताना त्रास होणं आणि छातीत दुखणं अशी लक्षणं दिसतात. गरम पाणी प्यायल्याने अन्न गिळणं आणि ते अन्ननलिकेतून पोटात जाणं थोडं सोपं होऊ शकतं.

वजन कमी करण्यासाठी एक पर्याय

काही लोक गरम पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते असा दावा करतात. डॉ. गंझू यांच्या मते, शौचानंतर शरीराचं वजन थोडं कमी झाल्यासारखं दिसू शकतं.

शरीर डिटॉक्स होण्यास मदत

गरम पाणी पिणं शरीरातील डिटॉक्स प्रक्रियेला मदत करू शकतं. पाणी प्यायल्याने किडनी शरीरातील अपायकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करतात. तसंच काही टॉक्सिन पदार्थ रक्तात विरघळण्यासही पाणी मदत करतं. मात्र हे फायदे केवळ गरम पाण्यापुरते मर्यादित नसून थंड पाणी प्यायल्यानेही मिळू शकतात.

रक्ताभिसरण

पुरेसं पाणी प्यायल्यामुळे शरीराला आणखी काही फायदे मिळतात. योग्य हायड्रेशनमुळे मज्जासंस्था योग्य पद्धतीने काम करतात. त्याचप्रमाणे मेंदूची कार्यक्षमता सुधारते आणि चिंता-तणाव कमी होण्यास मदत होते.

सर्दीपासून आराम

गरम पाण्याची वाफ घेतल्याने नाक बंद होण्याचा त्रास कमी होऊ शकतो. तसंच गरम पाणी प्यायल्याने घशातील कफ मऊ होतो आणि थंडीच्या वातावरणात शरीराला उब मिळते. मात्र हे फायदे चहा किंवा कॉफीसारख्या इतर गरम पेयांमुळेही मिळू शकतात.

टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इराणमध्ये अमिरेकन लढाऊ विमान कोसळलं, पायलटला पकडण्यासाठी बक्षीस केलं जाहीर, VIDEO

Fact Check: केंद्र सरकारची वर्क फ्रॉम होम योजना? महिलांना 25 हजार मानधन मिळणार?

Ashok Kharat: मुलानेच उघड केलं खरातचं हवाला कांड? चौकशीदरम्यान SIT ला सांगितली धक्कादायक माहिती

अवकाळी पावसाने वाजवले स्मार्ट सिटीचे तीनतेरा; स्मार्ट सिटी की 'नरक' सिटी, पुणेकरांचा संताप

Earthquake: दिल्लीसह उत्तर भारत भूकंपाच्या धक्क्याने हादरला, नागरिक घाबरून घराबाहेर पळाले; VIDEO समोर

SCROLL FOR NEXT