Benefits of potato Juice Saam TV
लाईफस्टाईल

Benefits Of Potato Juice : बटाट्याचा रस प्यायल्याने होऊ शकते प्रतिकारशक्ती मजबूत, जाणून घ्या त्याचे अनेक फायदे

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी बटाट्याचा फायदा कसा होतो जाणून घ्या.

कोमल दामुद्रे

Benefits Of Potato Juice : आपल्या घरात कोणतीही भाजी उपलब्ध नसते त्यावेळी आपण बटाट्याला अधिक प्राधान्य देतो. बटाट्याचा वापर प्रत्येक घरात दररोज केला जातो. बटाट्याचा वापर अनेक प्रकारच्या भाज्या बनवण्यासाठी केला जातो.

मुलांनाही बटाटे खायला आवडतात. हल्ली त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे फ्रेंच फ्राईज, चिप्स बनवले जातात. बटाटे खाण्याचे फायदेही अनेक आहेत, पण बटाट्यापेक्षा बटाट्याचा रस जास्त फायदेशीर आहे. बटाट्याचा रस त्वचेसाठी तसेच आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे.

एका ग्लास बटाट्याच्या रसामध्ये असलेल्या अनेक पोषक तत्व तर आहे त्याबरोबर जीवनसत्त्वे ए, बी, क, के, लोह, कॅल्शियम, जस्त, अँटीऑक्सिडंट्स, फॉस्फरस, तांबे, पोटॅशियम आदी घटक देखील त्यात आहेत. चला जाणून घेऊया, बटाट्याचा रस आरोग्यासाठी कसा फायदेशीर आहे.

कच्च्या बटाट्याचा रस प्रत्येकासाठी आरोग्यदायी नसतो, परंतु आपण तो कमी प्रमाणात पिऊ शकतो. बटाट्याचा थोडा रस पाण्यात मिसळूनही पिऊ शकता. मॅश केलेल्या आणि भाजलेल्या बटाट्यांपेक्षा कच्च्या बटाट्यामध्ये जीवनसत्व क जास्त असते. जीवनसत्व क हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, दृष्टी कमी होणे, सर्दी यांसारख्या समस्या टाळते.

बटाट्यामध्ये १३ प्रकारचे जीवनसत्व असते आणि हे सर्व प्रकारचे जीवनसत्व बटाट्यामध्ये आढळते. यामध्ये फोलेट , जीवनसत्व बी -६ सर्वाधिक असते आणि ते दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर असतात. जीवनसत्व बी-६ इंसुलिन तयार करते. संसर्गाशी लढा देते. फोलेट न जन्मलेल्या बाळाच्या मणक्याचा, मेंदूचा विकास सुधारतो.

शरीरासाठी झिंक देखील खूप महत्वाचे आहे. बटाट्याच्या रसाने आपण झिंकच्या कमतरतेवर मात करू शकतो. झिंक पुरेशा प्रमाणात घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते. जखमा लवकर बऱ्या होतात, डोळ्यांशी संबंधित समस्या नाहीशा होतात.

बटाट्यामध्ये जीवनसत्व क देखील असते, जे शरीराची प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी ओळखले जाते. याच्या मदतीने आपण सर्दी, इन्फेक्शन अशा अनेक प्रकारच्या समस्यांपासून दूर राहू शकतो.

बटाट्याच्या रसामध्ये दाहक-विरोधी प्रभाव असतो ज्यामुळे सूज, जळजळ किंवा लालसरपणा यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. असे मानले जाते की, बटाट्याचा रस प्यायल्याने सांधेदुखी आणि पाठदुखी बरी होते.

बटाट्याच्या (Potatoes) रसामध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल संरक्षणात्मक प्रभाव असतो. हे अल्सरच्या उपचारांमध्ये देखील मदत करू शकते. पोटातील अल्सर वाढू नये म्हणून दररोज एक कप बटाट्याचा रस पिणे फायदेशीर ठरू शकते. हे अँटीबैक्टीरियल प्रोबायोटिक पेय म्हणून देखील कार्य करते.

बटाट्यामध्ये फायबर, जीवनसत्व (Vitamins) ए, बी-कॉम्प्लेक्स आणि क सारखे आवश्यक पोषक असतात. हे पोषक तत्व शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात. बटाट्याच्या लगद्यापासून काढलेला रस पिणे एकूण आरोग्यासाठी आणि कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

बटाट्यामध्ये फायबर असते, जे बद्धकोष्ठतेची समस्या दूर करते. पचनसंस्था स्वच्छ राहते. एक ग्लास बटाट्याचा रस प्यायल्याने गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक्ट साफ होते आणि बद्धकोष्ठता देखील दूर होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT