Drink for Weight Loss Saam TV
लाईफस्टाईल

Drink for Weight Loss : हात पाय बारीक आणि पोट मात्र फुगलेलं; 'या' टीप्सने ढेरी होईल बारीक

Weight Loss Drinks : वजन कमी करण्यासाठी जिम जॉईन करून आता तुम्ही सुद्धा कंटाळले असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक आयुर्वेदिक उपाय शोधला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सध्या सर्वच व्यक्ती फास्ट फूड खातात. फास्ट फूड खाल्ल्यानं आपल्या शरीरात अतिरिक्त चरबी वाढते. यामुळे तरुण वयात सुद्धा अनेक व्यक्तींना लठ्ठपणा आला आहे. वजन कमी करण्यासाठी काही जण जिम जॉईन करतात. मात्र मोठी कसरत करूनही वजन काही कमी होत नाही.

काही व्यक्तींना हात पाय बारीक असून फक्त पोटावर जास्त चरबी वाढते. त्यासाठी ते भरपूर डाएट करतात. शिवाय जिममध्ये मोठी कसरत सुद्धा करतात. मात्र तरीही त्या व्यक्तींचे वजन कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी जिम जॉईन करून आता तुम्ही सुद्धा कंटाळले असाल तर तुमच्यासाठी आम्ही एक आयुर्वेदिक उपाय शोधला आहे.

पोट कमी करण्यासाठी प्या हे रामबाण ड्रिंक

सब्जा

पोटावरील चरबी कमी करायची असल्यास तुम्ही सब्जाचा वापर करू शकता. त्यासाठी आदल्या रात्री सब्जा पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एका भांड्यात पाणी गरम करून घ्या. या पाण्यात सब्जा आणि मीठ मिक्स करू प्या. त्याने पोट कमी होण्यासाठी मदत होते.

सब्जाच्या बियांमध्ये अल्फा-लिनोलेनिक जास्त प्रमाणात असते. त्यामुळे मेटाबॉलिज्म कमी होण्यास फार मदत होते. त्यासह सब्जा खाल्ल्याने पोट साफ होण्यासही मदत होते.

लिंबू

ढेरी कमी करण्यासाठी आणखी एक रामबाण उपाय म्हणजे लिंबू. लिंबूमधील अॅसीड पोट कमी करते. दररोज सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी घ्या. या पाण्याक लिंबाचा रस मिक्स करा. यात अन्य कोणतीही सामग्री मिक्स करू नका. फक्त कोमट पाणी आणि लिंबाचा रस मिक्स करून पिऊन घ्या. हे ड्रिंक देखील जास्त ढेरी वाढलेल्या व्यक्तींसाठी उपयुक्त आहे.

मध

मध खोकला आणि सर्दी अशा विविध आजारांवर आराम देते. तसेच पोटावरील चरबी कमी करताना मध उपयोगी ठरते. मधाचे सेवन देखील सकाळी अनुशापोटी करा. मध खाल्ल्याने शरीरातील फॅट कमी होते. या सिंपल ट्रिक्ससह तुम्ही आहारात तेलकट पदार्थ आणि बाहेरील जंक फूड खाणे देखील बंद केले पाहिजे. याने महिन्याच्या आत तुमचं ५ किलो वजन कमी होईल.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. पोट बारीक होण्यासाठी या टीप्सचा साम टीव्ही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या घरी ईडीची धाड; १२ ठिकाणी छापेमारी

Pune Tourism : ट्रेकिंग,सायकलिंग अन् पक्षी निरीक्षण; पुण्यातील विरंगुळ्याचे बेस्ट ठिकाण

Mallika Sherawat : मल्लिका शेरावत 'बिग बॉस 19'मध्ये सहभागी होणार का? स्वतःच केला खुलासा

ऑफिसमध्ये घुसला अन् अंदाधुंद गोळीबार, स्वत:वरही झाडल्या गोळ्या, ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं?

Maharashtra Politics: रेव्ह पार्टीचा खरा सूत्रधार कोण? ठाकरेंनी अग्रलेखात थेट 'या' भाजप नेत्याचं नाव घेतलं

SCROLL FOR NEXT