Viral News  Saam Tv
लाईफस्टाईल

Viral News : अजबच ! चक्क YouTube ची मदत घेऊन तिने केली शेती, तब्बल 5 लाखांहून अधिक नफा

वंदना सिंह या महिलेने यूट्यूब आणि गूगलवर व्हिडिओ पाहून स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुटची शेती सुरू केली आहे.

कोमल दामुद्रे

Viral News : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे की आपला भारतदेश शेतपाण्याने बहरून जावा. आपल्या भारतातील प्रत्येक शेतकऱ्याने जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावं आणि भरपुर पीक घ्यावं.

अशातच मिर्जापूर येथे राहणारी वंदना सिंह ही महिला प्रधानमंत्रींच्या त्या स्वप्नावर खऱ्या अर्थाने उतरली आहे. वंदना सिंह या महिलेने यूट्यूब आणि गूगलवर व्हिडिओ पाहून स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुटची शेती सुरू केली आहे.

आज वंदना सिंह लाखोंच्या घरात पैसे (Money) कमवतात. त्यांनी या वर्षी तब्बल पाच लाख एवढे प्रॉफिट कमवले आहे. ही शेतकरी महिला जशी आत्मनिर्भर बनली आहे तसचं सगळ्या महिलांनी तिचे आदर्श घेऊन पुढे चालायला पाहिजे.

शेतकरी वंदना सिंह यांना जिल्हाधिकारी दिव्या मित्तल यांच्याकडून सन्मानित करण्यात देखील आले होते. मिर्झापूर जिल्ह्याच्या इमीलीयाचट्टी येथे राहणारी वंदना सिंह बालुवा बजाहुर या गावामध्ये अर्ध्या एकर जमीनीमध्ये स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रूटची शेती करत आहे.

वंदना सिंह ही महिला गावाची गृहिणी असून लाखो रुपये कमवणारी महिला शेतकरी आहे. वंदना यांनी यूट्यूब वरती स्ट्रॉबेरी आणि ड्रॅगन फ्रुट यांची शेतीची व्हिडिओ पाहिली. त्यानंतर त्यांनी मोठ्या जिद्दीने विचार केला की आपण सुद्धा ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी या दोन फळांची शेती करायची.

गुगल (Google) माध्यमामधून माहिती घेतल्यानंतर त्यांना शेती करण्यासाठी उद्यान विभागाकडून सहयोग मिळाला. ड्रॅगन फ्रुट मधून नफा मिळाल्यानंतर त्यांनी आणखीन एक एकरमध्ये ड्रॅगन फ्रुटची शेती केली. वंदना यांनी ड्रॅगन फ्रुटची नर्सरी लावली आहे.

ड्रॅगन फ्रुटची शेती करण्यासाठी क्रंकिट पिलर, लोखंडाची रिंग , टायर आणि शेण या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असते. एक दोन वर्ष कमी प्रमाणात नफा होतो. परंतु तिसऱ्या वर्षापासून या शेतीमध्ये जास्त नफा मिळाला.

dragon fruit

वंदना सिंह यांनी सांगितलं की, ड्रॅगन फ्रुटचे एक रोपटे पन्नास रुपयाला मिळते. शेतामधून ड्रॅगन फ्रुट सरळ वाराणसी येथे नेण्यात येत. वाराणसी येथे चारशे रुपये एक किलोच्या हिशोबाने विक्री केले जातात.

वंदना सिंह यांनी त्यांच्या परिश्रमाबद्दल सांगितलं. किसान वंदना यांनी सांगितले की ड्रॅगन फ्रुटची शेती करण्याचा विचार युट्युब व्हिडिओ पाहून आला होता. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की महिलांसाठी ड्रॅगन फ्रुटची शेती करणे हे अत्यंत सोपे आहे.

ज्या महिलांना शेती करून पैसे कमवायचे आहेत त्यांनी. वेळात वेळ काढून ड्रॅगन फ्रुट च्या शेतीचा विचार करावा. कारण ड्रॅगन फ्रुटच्या शेतीमध्ये जास्त नफा कमवायला मिळतो. त्याचबरोबर त्या असंही म्हणल्या की महिला आता फक्त चूल आणि मुल सोडून शेतीतंत्रज्ञानाकडे देखील वळल्या आहेत आणि आत्मनिर्भर बनल्या आहे.

ड्रॅगन फ्रुटसोबत उरलेल्या जमिनीमध्ये स्ट्रॉबेरी आणि हळदीची शेती केली जाते. याचा सुद्धा जास्त प्रमाणात नफा (Profit) भेटतो. जिल्हाधिकारी दिव्या मित्तल यांनी सांगितले की वंदना सिंह या महिला सशक्तीकरनाचे उत्तम उदाहरण आहे. त्याचबरोबर त्या अथक परिश्रमाने आत्मनिर्भर बनल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: मतभेदांपेक्षा महाराष्ट्र महत्वाचा; भर सभेत राज ठाकरे यांची भावनिक साद

kiwi Benefits: किवी फळाचे असंख्य फायदे!

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Champions Trophy: टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार का दिलाय? समोर आलं खरं कारण

Kalyan News : कल्याण-डोंबिवलीत ४० जण तडीपार; ऐन निवडणुकीत पोलिसांची धडक कारवाई

SCROLL FOR NEXT