Chanakya Niti yandex
लाईफस्टाईल

Chanakya Niti: वयाच्या २० वर्षांनंतर 'या' चुका करूच नका; नाहीतर वाईट काळ सुरु झाला असं समजा

Chanakya Niti: आचार्य चाणक्य हे धर्मग्रंथाचे उत्तम जाणकार होते. वयाच्या 20 वर्षांनंतर तरुणाने या चुका केल्या तर त्याचे परिणाम भविष्यात त्याला भोगावे लागतात. जाणून घेऊया चाणक्य नीतीमध्ये कोणत्या चुकांचा उल्लेख करण्यात आला आहे.

Surabhi Jagdish

आचार्य चाणाक्य महान विद्वान होते. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीती या ग्रथांमध्ये खूप चांगली माहिती दिली आहे. चाणक्य नीति व्यवसाय, वैवाहिक जीवन, पैसा आणि आरोग्याशी संबंधित गोष्टींची माहिती देते. आचार्य चाणक्य हे धर्मग्रंथाचे उत्तम जाणकार होते. त्यांनी निती शास्त्राची रचना केली असून यामध्ये दिलेल्या माहितीचा आजच्या काळातील लोकांना फायदा होताना दिसतो.

आचार्य चाणक्यांनीही जीवनात यशस्वी होण्याचे काही मंत्र दिले आहेत. या नियमांचे पालन केल्याने एक सामान्य माणूसही आपल्या आयुष्यात यशस्वी व्यक्ती बनू शकतो. वयाच्या 20 वर्षांनंतर अनेक चुका करू नका, असा सल्लाही चाणक्यांनी दिलाय. वयाच्या 20 वर्षांनंतर तरुणाने या चुका केल्या तर त्याचे परिणाम भविष्यात त्याला भोगावे लागतात. जाणून घेऊया चाणक्य नीतीमध्ये कोणत्या चुकांचा उल्लेख करण्यात आला आहे.

वेळेला वाया जाऊ देऊ नका

आचार्य चाणक्य नीती शास्त्रात सांगितलं की, वयाच्या 20 वर्षानंतर अजिबात वेळ वाया घालवू नका. कारण वेळ खूप मौल्यवान असून त्याचा गैरवापर होता कामा नये. एकदा निघून गेलेली वेळ परत येणार नाही. विनाकारण वेळ वाया घालवणाऱ्या लोकांना आयुष्यभर अडचणींचा सामना करावा लागतो.

पैसे वाया घालवू नका

चाणक्य नीतीनुसार, वयाच्या 20 वर्षांनंतर तरूणांनी पैसा खर्च करण्याबाबत हुशारी दाखवली पाहिजे. हुशारीने खर्च केला पाहिजे. विशेषतः तरुणाईमध्ये पैशाचं महत्त्व समजून घेणं गरजेचं असून हे आर्थिक युग आहे. त्यामुळे वायफळ खर्च करू नयेत.

अतिराग टाळा

आचार्य चाणक्य नीती शास्त्रात नमूद केलंय की, क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. वयाच्या 20 नंतर काहीही बोलताना किंवा रागाच्या भरात बोलताना विचार करा. तारुण्यात जास्त राग येतो. त्यावर नियंत्रण ठेवणं काहीसं कठीण आहे.

आळशी बनू नका

आचार्य चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, वयाच्या 20 वर्षांनंतर व्यक्तीने कामाच्या बाबतीत सावध राहिलं पाहिजे. तुम्ही बेफिकीर राहिल्यास किंवा दुर्लक्ष केल्यास त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात. त्यामुळे आळस टाळणं गरजेचं आहे.

डिस्क्लेमर : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांना देत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Exit Polls of Maharashtra : पलूस कडेगाव मतदारसंघात काँग्रेस गड राखणार का? कोण होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: पलूस-कडेगावमध्ये काँग्रेस गड राखणार? कोण बाजी मारणार? पाहा Exit Polls

Maharashtra exit polls : उदगीरमध्ये गुलाल कोण उधळणार? शरद पवार गट की अजित पवार गट? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls: उल्हासनगरमध्ये सत्तांतर होणार? ओमी कलाणी की कुमार आयलानी कोण बाजी मारणार?

Maharashtra Exit polls : बुलढाण्यात शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचा परभव होणार? कोण जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT