लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात. लहान मुलांना आपण जे काही शिकवतो तेच ते शिकत लहानाची मोठी होतात. शालेय जीवनात मुलांना फार जपावे लागते. त्यांना चांगल्या वाईट गोष्टी समजावून सांगाव्या लागतात. प्रत्येक पालकांना आपलं मुल सर्वांपेक्षा छान आणि गुणी असावं असं वाटतं. त्यासाठी ते मुलावर संस्कार करतात.
संस्कार करताना काही पालक मुलांवर जास्त सक्ती करतात. मुलांना छान बनवण्याच्या चक्करमध्ये काही पालक हे विसरून जातात की ही आपली लहान मुलं आहे. त्यांना त्यांच्या पद्धतीने शांततेत समजावून सांगितले पाहिजे. पालकांनी मुलांशी व्यवस्थित वर्तन न केल्यास त्यांच्या मनात पालकांविषयी द्वेष निर्माण होतो.
या चुका टाळा
सतत ओरडणे
काही पालक आपल्या मुलांना सतत ओरडतात. मुलांनी साध्या साध्या चुका केल्यावर ती लहान मुलं आहेत ती नाही चुकणार तर कोण चुकणार असा विचार न करता पालक मुलांना ओरडण्यास आणि रागवण्यास सुरुवात करतात. याचा मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. आपले आई-वडील आपल्यावर प्रेम करत नाहीत अशा भावना त्यांच्या मनात येतात.
दुसऱ्यांशी तुलना करणे
प्रत्येक मुलाचे विचार आणि बुद्धी वेगवेगळ्या प्रकारची असते. स्पर्धेत बरीच मुलं असतात मात्र प्रत्येकाचा विजय होतो असं नाही. काही मुलं फार हुशार असतात तर काही मुलं फार मंद असतात. दोघांची आकलन क्षमता वेगवेगळी असते. अशात कमजोर असलेल्या मुलाची सतत हुशार मुलांशी तुलना करू नये. कारण त्याने कमजोर मुलं आणखी मागे पडतात. आई वडिलांनी प्रेम आणि माया दाखवली तर ही मुलं पुढे जातात. मात्र त्यांची दुसऱ्यांशी तुलना केल्याने त्यांना सुद्धा आपण काहीच करू शकत नाही असं वाटू लागतं.
मारहाण करणे
काही घरांमध्ये पती-पत्नीची सतत भांडणे होतात. या भांडणांमुळे पालकांना आधीच राग आलेला असतो. अशात काही लहान मुलं हट्टीपणा करतात. रडतात आणि आरडाओरडा करतात. तेव्हा रागामध्ये पालक मुलांना चांगलाच चोप देतात. मुलांना वयानुसार ओरडले, रागवले आणि मारले पाहिजे मात्र त्यांना सतत मारहाण करणे चूक आहे.
टीप : वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.