Hair care tips, Hair falls problem, Hair care
Hair care tips, Hair falls problem, Hair care ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लाईफस्टाईल

केसांना तेल लावल्यानंतर चुकूनही या गोष्टी करु नका, अन्यथा होईल नुकसान

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : वाढत्या प्रदुषणामुळे जितके आपल्या शरीराला नुकसान होते तितकेच आपल्या केसांना ही होते. धूळ व हवेत असणाऱ्या केमिकल्समुळे आपल्याला केसांना हानी पोहोचते. (Hair care tips)

हे देखील पहा -

केस (Hair) निरोगी ठेवण्यासाठी त्यांना अधिक पोषक तत्वांची गरज असते. केसांची योग्य काळजी घेतल्यानंतर आपले केस दाट, लांब आणि चमकदार होतात. पण केमिकल हेअर प्रोडक्ट्स वापरल्याने केस लवकर खराब होतात. बऱ्याचदा आपण केसांना तेल लावतो पण, केसांना योग्य तेल (Oil) लावण्याची पध्दत कोणती? तेल लावल्यानंतर काय करु नये ? तेल लावल्यानंतर केसांना मसाज कारावा का ? केसांना तेल लावल्यानंतर कोणत्या चुका करु नये हे जाणून घेऊया.

केसांना तेल लावल्यानंतर या चुका शक्यतो करु नका-

१. केसांना तेल लावल्यानंतर लगेच कंगवा फिरवू नका. तेल लावल्यानंतर बऱ्याचदा केसांमध्ये गुंता होऊ लागतो व अशावेळी आपण केसांमध्ये कंगवा फिरवल्यानंतर केस तुटतात.

२. केसांमध्ये तेल जितके जास्त वेळ ठेवले जाईल तितका केसांना अधिक फायदा होईल असे आपल्याला वाटू लागते पण, केसांना अधिक तेल लावल्यानंतर केस चिकट होतात. त्यावर धूळ आणि घाण सहज जमा होते. त्यामुळे केस अधिक खराब होतात. त्यामुळे केसांमध्ये जास्त वेळ तेल ठेवू नका. तसेच केसांना तेल लावून रात्रभर झोपू नका.

३. केसांचा तेलाने मसाज केल्यानंतर लगेच केस धुवू नका. लगेच केस धुतल्याने केसांना पुरेसे पोषण मिळत नाही. त्यामुळे आपले केस कमकुवत होतील.

४. केसांना तेल लावल्यानंतर केस घट्ट बांधू नका. केसांना तेल लावल्यानंतर के अधिक नाजूक होतात. केस घट्ट बांधल्यामुळे केस गळतीची समस्या सुरु होते. त्यामुळे तेल लावल्यानंतर चूकनही केस बांधू नका. हवे असल्यास सैल वेणी घालू शकता.

५. केसांना अधिक तेल लावल्यास केसांचे नुकसान होते. केस धुतल्यानंतरही केसांमधले तेल निघत नाही त्यामुळे केस चिकट होतात व धुतल्यानंतर केसही निस्तेज दिसतात.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Edited By - Komal Damudre

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : निलेश लंके, सुजय विखे पाटील यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

Sleeping Promblem: रात्री चांगली झोप लागत नाही, आहारात करा बदल

Lok Sabha Election: नवी मुंबईत भाजपमध्ये फूट?, मंदा म्हात्रे यांचं मोठं वक्तव्य

Health Tips: तुम्हाला वारंवार पोटाचे विकार होतात का? आहारात 'या' गोष्टीचा करा समावेश

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून नरेंद्र मोदी उद्धव ठाकरे यांना फोन करायचे: देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं त्या घटनेमागचं सत्य

SCROLL FOR NEXT