Excessive Thirst Causes saam tv
लाईफस्टाईल

Excessive thirst: दिवसभर पाणी पिऊनही तहान भागत नाही? शरीर देतंय या धोकादायक आजाराचा इशारा

Why do I feel thirsty all the time even after drinking water: उन्हाळ्यात वारंवार तहान लागणे हे केवळ उष्णतेचे लक्षण नसून मधुमेह किंवा डिहायड्रेशनचे संकेत असू शकतात. डिहायड्रेशनमुळे तहान, चक्कर येणे, तोंड कोरडे पडणे आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे दिसू शकतात.

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळ्यात तीव्र उन्हाच्या झळा, उष्णतेची लाट आणि उच्च तापमानामुळे तहान लागणं ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु उन्हाळ्यात वारंवार पाणी पिऊनही जर तुम्हाला तहान लागत असेल तर तो केवळ उष्णतेचा परिणाम नसून एका गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या संशोधनानुसार, अति तहान (पॉलिडिप्सिया) हे मधुमेह, लिव्हरचे आजार आणि शरीरातील कोणत्याही गंभीर आजाराचं कारण ठरू शकतं.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, जर तहान लागण्यासोबतच वारंवार लघवी होणं, थकवा, तोंड कोरडं पडणं किंवा अचानक वजन कमी होणं यांसारखी लक्षणं दिसत असतील तर ही एक अधिक गंभीर समस्या असू शकते.

वारंवार तहान लागण्याची प्रमुख कारणं

डिहायड्रेशन

तहान लागण्याचं सर्वात सामान्य कारण म्हणजे डिहायड्रेशन. तीव्र उष्णता, जास्त घाम येणे, अतिसार, उलट्या किंवा अपुरे पाणी पिणे यामुळे निर्जलीकरण होऊ शकते. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, निर्जलीकरणामुळे तहान लागणं, चक्कर येणं, तोंड कोरडे पडणं आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणं दिसू शकतात.

मधुमेह

वारंवार तहान लागणं आणि वारंवार लघवी होणं ही मधुमेहाची काही सुरुवातीची लक्षणं आहेत. अमेरिकन डायबेटिस असोसिएशनच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, ज्यावेळी रक्तातील ग्लुकोजची पातळी वाढते, तेव्हा शरीर लघवीद्वारे अतिरिक्त ग्लुकोज बाहेर टाकू लागते. यामुळे हळूहळू डिहायड्रेशन होतं. ज्यामुळे वारंवार तहान लागते.

लाळेची कमतरता

ज्यावेळी ग्रंथी पुरेशी लाळ तयार करत नाहीत, तेव्हा तोंड कोरडं पडतं आणि तुम्हाला वारंवार तहान लागू शकते. जे लोक उन्हाळ्यात कमी पाणी पितात त्यांच्या शरीरातही लाळ कमी तयार होते.

सोडियमचं सेवन

जे लोक आपल्या आहारात भरपूर तळलेले किंवा मसालेदार पदार्थ खातात त्यांनाही वारंवार तहान लागण्याची समस्या जाणवते. जास्त मीठ असलेल्या पदार्थांमुळे शरीरातील सोडियमचं प्रमाण वाढतं. यामुळे शरीरातील पाण्याचं संतुलन राखणं कठीण होतं. परिणामी तुम्हाला वारंवार तहान लागू लागते.

वारंवार लागणारी तहान कशी मिटवावी?

  • उन्हाळ्यात दररोज २ ते ३ लिटर पाणी प्या

  • जास्त मीठ आणि प्रोसेस्ड पदार्थ टाळा

  • गरम हवामानात इलेक्ट्रोलाइट्सने समृद्ध पेयं प्या

  • फळं आणि भाज्यांसारखे पाण्याने भरपूर असलेले पदार्थ खा

  • जर तुम्हाला मधुमेह असेल, तर तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवा

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT