Monsoon Skin Care freepik
लाईफस्टाईल

Monsoon Skin Care: पावसात भिजल्यावर त्वचेला खाज येतेय? घरच्या घरी करा हे १० उपाय, मिळेल झटपट आराम

Rain Allergy: पावसात भिजल्यानंतर शरीरावर खाज येत असल्यास घाबरू नका. काही सोपे घरगुती उपाय करून पाहा, जे त्वचेच्या त्रासावर त्वरित आराम देऊ शकतात.

Dhanshri Shintre

पावसाळा आनंददायी असला तरी तो त्वचेच्या समस्याही घेऊन येतो, विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील असते त्यांच्यासाठी. ओलाव्यामुळे त्वचेवर खाज सुटणे आणि त्यानंतर बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढते. अशा वेळी औषध न घेता काही घरगुती उपाय करून तुम्ही आराम मिळवू शकता. हे उपाय वापरण्यास सोपे असून त्वचेवरील खाज कमी करण्यात मदत करतात. चला, जाणून घेऊया हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय.

कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करा

तुमच्या घराजवळ कडुलिंबाचे झाड असल्यास त्याचा वापर खाज येण्यावर प्रभावी उपाय ठरू शकतो. कडुलिंबाची पाने पाण्यात उकळा, ते पाणी गाळून थंड करा आणि त्याने आंघोळ करा. हे पाणी त्वचेवरील जंतू मारण्यास मदत करते आणि खाज सुटण्यापासून आराम देते.

कोरफडीचे जेल लावा

पावसाच्या पाण्यामुळे त्वचेवर खाज येत असल्यास, कोरफडीचा (एलोवेरा) जेल हा एक उत्तम घरगुती उपाय ठरतो. ताज्या कोरफडीचे जेल थेट त्वचेवर लावल्यास थंडावा मिळतो आणि त्यातील औषधी गुणधर्म खाज कमी करून त्वचेला त्वरित आराम देतात. रोज वापरल्यास परिणाम लवकर जाणवतो.

कापूर आणि नारळ तेल

जर त्वचेची खाज वाढत असेल, तर नारळ तेल आणि कापूर यांचा वापर प्रभावी ठरतो. थोडं खोबरेल तेल गरम करून त्यात चिमूटभर कापूर मिसळा आणि हे मिश्रण त्वचेला लावा. कापूर संसर्ग विरोधी आहे, तर नारळ तेल त्वचेचा ओलावा टिकवतो. वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट अवश्य घ्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

SCROLL FOR NEXT