Sweet Food Affect Childrens Memory
Sweet Food Affect Childrens Memory Saam Tv
लाईफस्टाईल

Sweet Food Affect Children's Memory : गोड पदार्थामुळे मुलांच्या स्मरणशक्तीवर होतोय का परिणाम?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Children's Memory Affected By Sweet Food : सर्व मुलांना गोड खायला आवडते. मग ते मुल लहान असो किंवा मोठे त्यांना गोड खायला नक्कीच आवडत असते. नाराज झालेल्या मुलांची नाराजगी दूर करण्यासाठी पालक त्यांना चॉकलेट किंवा काहीतरी गोड खाऊ देतात.

पण तुम्हाला माहित आहे का मुलांना गोड पदार्थ (Food) खायला दिल्याने त्यांच्या स्मरणशक्तीवरच नाही तर शिकणाच्या क्षमतेवर देखील परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊया याविषयी संपूर्ण माहिती.

गोड पदार्थांचे सेवन केल्याने लहान मुलांच्या शिकण्यावर आणि स्मरणशक्तीवर परिणाम होतो का?

एका संशोधनातून असे समोर आले आहे की, साखरेच्या अतिसेवनामुळे स्मरणशक्तीच्या आणि शिकणयाच्या महत्त्वाच्या भागावर परिणाम होतो. हिप्पोकॅम्पवर या महत्त्वाच्या भागावर नकारात्मक परिणाम होतो.

शास्त्रज्ञांनी उंदरावर केलेल्या एका प्रयोगामध्ये उंदराला रोज गोड पेय देण्यात आले. या संशोधनात असे आढळून आले की या सवयमुळे बालपणातील शिकण्याच्या आणि स्मरणशक्तीच्या सामान्य कार्यावर परिणाम होऊ शकतो.

लठ्ठपणा -

जंक फूड हे मुलांच्या लठ्ठपण्याचे कारण आहे असे अनेक पालकांना (Parents) वाटत असते. मात्र मुलानं मधील साखरेचे प्रमाण देखील लठ्ठपणाचे कारण असू शकते.

दातांची समस्या -

जास्त गोड पदार्थ खाल्ल्यामुळे दातांना कीड लागण्याची शक्यता असते. शरीरातील आवश्यक कॅल्शियमची कमी झाल्याने दातांमध्ये पोकळी निर्माण होऊन दातांच्या समस्या उद्भवू शकतात.

कमकुवत रोगप्रतिकारशक्ती -

साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने मुलांमध्ये प्रतिकारशक्ती कमी होऊ शकते. पांढऱ्या साखरेत असलेल्या रिफाइंड शुगर मध्ये काही घातक रसायन असतात जे मुलांच्या आरोग्यासाठी हानिकारक असते.

किडनीवर परिणाम होऊ शकतो -

मुलांना मर्यादित स्वरूपात साखर खायला दिल्यास ते निरोगी राहतील. त्यांना जास्त साखर व मीठ खायला दिल्यास किडनीच्या समस्या उद्भवू शकतात.

पचनास समस्या -

लहान मुलांना भरपूर प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यास त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.त्यांना गॅस्ट्रोइंटेस्टाईल ट्रॅक मध्ये समस्या निर्माण होऊ शकतात.

मुलांची गोड खाण्याची सवय कशी कमी करावी?

  • मुलांना जास्ती गोड पदार्थ देण्याऐवजी फक्त हेल्दी फूड खायला द्या.

  • मुलांना दिवसातून कमीत कमी दोन वेळेस फ्लोराईड टूथपेस्ट ने ब्रश करायला सांगा.

  • मुलांची नाराजगी दूर करण्यासाठी गोड पदार्थांची मदत घेऊ नका.

  • घरामध्ये गोड पदार्थ मर्यादित प्रमाणात आणत जा.

  • मुलांनच्या आरोग्यदायी सवय लावण्यासाठी नेहमी साखरे शिवाय फक्त दूध प्यायला द्या.

  • कधीही मुलांना कोणतेही पॅकबंद खाद्यपदार्थ देण्याआधी त्यातील साखरेचे प्रमाण चेक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT