Physical Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Physical Relationship : वयाची चाळीशी ओलाडल्यानंतर लैगिंक क्षमता कमी होते का ? समस्या की समज, जाणून घ्या सविस्तर

Couple Tips : जोडीदारासोबत नाते घट करण्यासाठी इमोशनल अटॅचमेंट सोबतच फिजिकल इंटीमेसी देखील आवश्यक असते यामुळे एकमेकांमध्ये प्रेम वाढते.

कोमल दामुद्रे

Relationship Tips for Couple : लग्न झाल्यानंतर प्रत्येक जोडप्यात प्रेम असणे गरजेचे असते. या नात्यात दोन्ही जोडीदार आपल्या पार्टनरसोबत खुश असायला हवे. जोडीदारासोबत नाते घट करण्यासाठी इमोशनल अटॅचमेंट सोबतच फिजिकल इंटीमेसी देखील आवश्यक असते यामुळे एकमेकांमध्ये प्रेम वाढते.

२८ ते ३०व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर प्रत्येक जोडप (Couple) आपल्या कुटुंबाचे (Family) नियोजन करण्याची योजना आखतात. यानंतर मुलं जन्माला घालणे व त्याचे संगोपन करणे यात त्यांचा बरचसा वेळ निघून जातो. अशातच वय वाढत जाते. मुलही मोठी होतात ज्यामुळे जोडप्यांना आपल्या नात्याला (Relationship) हवा तसा वेळ देता येतो.

जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वय उलटून गेलेले असते. त्यामुळे मनात एक संभ्रम निर्माण होतो. बरेचदा अनेक जोडप्यांना असे वाटते की, वयाची चाळीशी ओलाडल्यानंतर आपले शरीर आपल्या हवे तशी साथ देईल का ? आपण आपल्या पार्टनरला या वयातही पूर्वीप्रमाणे शरीर सुख देऊ शकतो का ? त्यामुळे याविषयावर जोडपे एकमेकांशी बोलणे टाळतात. जर लैंगिक संबंध ठेवले तर त्याची क्षमता कमी असेल का असे समज व गैरसमज त्यांना वाटत असतात. जाणून घेऊया त्याबद्दल

1. वयाच्या चाळीशीनंतर लैंगिक जवळीक कमी होणे सामान्य आहे का?

वयाच्या चाळीशीनंतर अनेकदा लैंगिक क्षमता कमी होते, म्हणजेच महिलांमध्ये (Women) संबंध बनवण्याची इच्छा कमी होते यामागे शरीरातील अनेक हार्मोन्स जबाबदार असतात. तसेच, घर आणि मुलांची जबाबदारी, थकवा, तणाव, शारीरिक कमजोरी, आजार किंवा औषधांचा (Medicine) परिणाम, झोप न लागणे याही मुख्य कारणांमध्ये सेक्स ड्राइव्ह कमी होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये समाविष्ट आहे.

हे हार्मोन्स सेक्स ड्राइव्हसाठी जबाबदार असतात, जे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये असते. स्त्रियांमध्ये, रजोनिवृत्तीनंतर या हार्मोनची पातळी कमी होऊ लागते, ज्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते.

2. कमी सेक्स ड्राइव्हच्या समस्येवर कशी मात करावी ?

क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, निरोगी जीवनशैली आणि तणाव व्यवस्थापनामुळे अनेक महिला आणि पुरुषांमध्ये कमी सेक्स ड्राइव्हच्या समस्येवर मात करता येते.

Disclaimer : सदर माहिती सामान्य आहे कृपया तज्ज्ञांचा योग्य सल्ला घ्यावा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: संगरनेरमध्ये बाळासाहेब थोरात होणार आमदार? VIDEO

Maharashtra Exit Poll: चोपडा मतदारसंघातून चंद्रकांत सोनवणे होणार आमदार? पाहा Exit Poll

Kopargaon News : बसच्या सीटखाली विद्यार्थ्यांला सापडले नोटांचे बंडल; मतपेट्या आणलेल्या बसमध्ये रक्कम सापडल्याने खळबळ

Chalisgaon News : निकालापूर्वी चाळीसगावात झळकले विजयाचे बॅनर; आमदार चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी लावले फ्लेक्स

Salman Khan : बाप लेकाचा स्वॅग न्यारा! दबंग स्टाइलमध्ये भाईजान बसला वडिलांच्या बाईकवर, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT