Oily Skin Need Moisturizer Saam Tv
लाईफस्टाईल

Oily Skin Need Moisturizer : तेलकट त्वचेला मॉश्चरायझरची गरज असते का? कोणते मॉश्चरायझर आहे बेस्ट ? जाणून घ्या

Best Moisturizer For Oily Skin : सतत चेहरा धुतल्यामुळे तेल निघून जाईल असे अनेकांना वाटते परंतु, चेहरा कितीही स्वच्छ केला तरी त्वचेला तेल सुटत राहाते.

कोमल दामुद्रे

Summer Care For Oily Skin : उन्हाळ्यात तेलकट त्वचा ही अधिकच चिकट होते. अशावेळी कोणते मॉश्चरायझर लावावे हा प्रश्न सर्वांना पडतो. सतत चेहरा धुतल्यामुळे तेल निघून जाईल असे अनेकांना वाटते परंतु, चेहरा कितीही स्वच्छ केला तरी त्वचेला तेल सुटत राहाते.

अशावेळी आपल्याला मॉश्चरायझर लावणे अधिक सोपे वाटते. परंतु, यामुळे आपली त्वचा अधिक तेलकट होऊ शकते का ? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. मॉइश्चरायझर हा आपल्या स्किन केअर रूटीनचा एक आवश्यक भाग आहे. पण तेलकट त्वचेला खरंच मॉइश्चरायझरची गरज नसते का?

तुम्हाला तुमची त्वचा (skin) मॉइश्चरायझ करणे आवश्यक आहे मग तेलकट त्वचेला मॉइश्चरायझ कसं करायचं? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

1. त्वचा तेलकट का असते ?

तेलकट (Oily) त्वचेची समस्या सेबमच्या जास्त उत्पादनामुळे होते. आपल्या त्वचेच्या तेल ग्रंथी, ज्याला सेबेशियस ग्रंथी म्हणतात, जास्त सेबम तयार करू लागतात. सेबम त्वचेच्या थराला हायड्रेट आणि संरक्षित करण्याचे काम करते, परंतु जेव्हा ते जास्त प्रमाणात तयार होते तेव्हा त्वचा तेलकट आणि चिकट दिसते. त्वचेची काळजी न घेतल्याने जास्त सीबम होऊ शकतो. यामुळे तुमची त्वचेतील ओलावा कमी होतो, परंतु मॉइश्चरायझर लावल्यास ती पुन्हा आहे तशी करण्यास मदत होते.

2. तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर आवश्यक आहे का?

तेल आणि मॉइश्चरायझर या दोन भिन्न गोष्टी आहेत. जर तुम्ही मॉइश्चरायझर लावले नाही तर तुमची त्वचा कोरडी राहील आणि हा कोरडेपणा टाळण्यासाठी त्वचेला जास्त तेल निर्माण होईल. तुमची त्वचा तेलकट असली तरीही तुम्ही चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावायला हवे.

3. कोणते मॉइश्चरायझर बेस्ट आहे ?

तेलकट त्वचेसाठी मॉइश्चरायझर निवडणे थोडे त्रासदायक असू शकते. यासाठी आपण योग्य तो मॉइश्चरायझर निवडणे आवश्यक आहे. मॉइश्चरायझर निवडताना त्यात कमी पाणी (Water) असेल असा निवडायला हवा. तसेच यामध्ये अधिक प्रमाणात तेल किंवा पेट्रोलियम नसावे. तर, क्रीम आणि लोशन त्वचेवर जड वाटतात आणि त्वचेत शोषण्याऐवजी ते त्वचेला तेलकट करतात. नॉन-कॉमेडोजेनिक आणि वॉटर-बेस्ड जेल फॉर्म्युलेसह मॉइश्चरायझर्स निवडा जे त्वचेचे छिद्र बंद करणार नाहीत आणि तुमची त्वचा हायड्रेट ठेवतील.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT