आजकाल जवळपास प्रत्येक घरात वॉशिंग मशीनचा वापर केला जातो. वॉशिंग मशीनमुळे कपडे धुण्याचं काम खूप सोपं झालं आहे. यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाचतात. पण अनेकदा मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतरही त्यांना दुर्गंधी येते. काही कपड्यांवरील डाग तसेच राहतात तर काही कपडे धुतल्यानंतर फिके दिसू लागतात. अशा वेळी अनेक जण वॉशिंग मशीनमध्येच काहीतरी बिघाड असल्याचा विचार करतात. पण प्रत्येक वेळी मशीनमध्ये बिघाड असतोच असं नाही. अनेकदा मशीन वापरताना आपण केलेल्या छोट्या चुका याला कारणीभूत असतात.
डिटर्जंटचा योग्य वापर न करणं, मशीनमध्ये एकाच वेळी जास्त कपडे भरणं किंवा मशीनची वेळेवर स्वच्छता न करणं यामुळे कपड्यांचा रंग आणि ताजेपणा कमी होऊ शकतो. पण काही सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर कपडे चांगले स्वच्छ होऊ शकतात. त्यासाठी वॉशिंग मशीन वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, हे जाणून घेऊया.
अनेक जण वेळ वाचवण्यासाठी एकाच वेळी मशीनमध्ये जास्त कपडे टाकतात. पण असं करणं टाळा. मशीनमध्ये खूप कपडे भरल्यामुळे पाणी आणि डिटर्जंट प्रत्येक कपड्यापर्यंत नीट पोहोचत नाही. त्यामुळे कपड्यांवरील मळ आणि डाग पूर्णपणे निघत नाहीत. याशिवाय मशीनच्या मोटरवरही जास्त ताण येतो. त्यामुळे मशीनच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
कपडे जास्त स्वच्छ व्हावेत म्हणून अनेक जण जास्त डिटर्जंट टाकतात. पण ही सवय चुकीची आहे. गरजेपेक्षा जास्त डिटर्जंट वापरल्यास त्याचे डाग कपड्यांमध्ये राहू शकतात. त्यामुळे कपडे कडक होतात. काही लोकांच्या त्वचेला यामुळे खाज किंवा जळजळही होऊ शकते. त्यामुळे किती कपडे आहेत आणि ते किती मळलेले आहेत यानुसार डिटर्जंट वापरावं.
कपडे स्वच्छ ठेवण्यासाठी वॉशिंग मशीन स्वच्छ ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मशीनचा ड्रम, डिटर्जंट ठेवण्याची ट्रे, रबरची पट्टी आणि फिल्टरमध्ये हळूहळू मळ, बुरशी, कपड्यांचे छोटे धागे आणि डिटर्जंटचे अंश जमा होतात. त्यामुळे मशीनमध्ये कपडे धुतल्यानंतरही त्यांना वास येऊ शकतो.
प्रत्येक प्रकारचे कपडे एकाच पद्धतीने धुता येत नाहीत. सुती, जीन्स, सिंथेटिक, रेशमी आणि लोकरीचे कपडे यांच्यासाठी वेगवेगळे वॉश मोड असतात. नाजूक कपड्यांसाठी जेंटल सायकल निवडावी. तर जास्त मळलेल्या कपड्यांसाठी योग्य वॉश मोड वापरावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.