Mental Trauma In Relationship Saam Tv
लाईफस्टाईल

Mental Trauma In Relationship : मानसिक छळ केल्यानंतरही तुमचे त्याच्यावर प्रेम आहे? हे प्रेम नाही तर मानसिक ट्रॉमा असू शकते, जाणून घ्या लक्षणे

Mental Trauma : कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन्ही पक्षाकडून सारखे एफर्ट्स लावणे गरजेचे असते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Trauma In Relationship : कोणतेही नाते टिकवण्यासाठी दोन्ही पक्षाकडून सारखे एफर्ट्स लावणे गरजेचे असते. अन्यथा नाते टिकवणे अवघड होते. सुरुवातीला नाती चांगली वाटतात पण जसजसा वेळ जातो. तसतसे अंतर आल्याने नात्यात आंबटपणा निर्माण होतो.

परिणामी नात्यात अनेकदा दुरावा येतो आणि भांडणे होतात. मात्र नात्यातील आंबटपणानंतर किंवा सतत होणाऱ्या भांडणानंतरही (Fight) तुमची इच्छा असूनही तुम्हाला यातून बाहेर पडतात येत नसेल, तर ट्रॉमा बॉण्ड असू शकते.

कारण गेल्या काही दिवसात असे अनेक प्रकरणे समोर आली आहे, त्यामुळे प्रत्येकाला असे विचार करायला भाग पाडले आहे की, प्रेमळ नात्यात द्वेष कसा भरून येतो. तुम्हालाही एखाद्या नात्यातून (Relationship) बाहेर पडण्याची इच्छा असूनही बाहेर पडता येत नसेल तर तुम्ही देखील ट्रॉमा बाँडचा शिकार होऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहेत लक्षणे.

ट्रॉमा बाँड काय आहे -

ट्रॉमा बाँड प्रेयसी-प्रेयकर किंवा नवरा-बायको यांच्यात अनेकदा दिसून येतो. पण इतर नात्यातही असे होऊ शकते. जेव्हा एखादी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला सतत दुखावत राहते. तेव्हा ट्रॉमा बाँड निर्माण होतो, मात्र इमोशनल अटॅचमेंटमुळे व्यक्तीला इच्छा असूनही नात्यातून बाहेर पडता येत नाही. तसेच त्यांच्याविरूद्ध बोलूही शकत नाहीत. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर लक्षणावरून तुम्ही ते ओळख.

पार्टनरशिवाय सुरक्षित वाटणे -

अनेकदा रिलेशनशिपमध्ये लोक आपल्या पार्टनरवर अवलंबून असतात. यामुळे जोडीदार जवळपास नसल्यास तुम्हाला अस्वस्थ किंवा असुरक्षित वाटू लागते. जर तुमच्यासोबतही असे होत असेल तर हे ट्रॉमा बॉन्डचे लक्षण असू शकते.

कमी आत्मसन्मान -

कधी कधी आत्मसन्मान नसल्यामुळे माणसे आपोआप या बंधनात अडकतात. जे लोक ट्रॉमा बॉन्डच्या आहारी गेले आहेत, त्यांचा आत्मसन्मान कमी होतो आणि त्यांना असे वाटते की ते नातेसंबंधात योग्य आहेत.

गैरवतानाकडे दुर्लक्ष -

ट्रॉमा बाँडमध्ये अडकलेले लोक नातेसंबंधातील गैरवतानाकडे दुर्लक्ष करतात. अशा वेळेस घडणाऱ्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात आवाज उठवण्याऐवजी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात.

पार्टनर बदलण्याचे वचन देतो -

रिलेशनशिपमध्ये तुमच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात जेव्हा तुम्ही आवाज उठवता तेव्हा तुमचा पार्टनर तुम्हाला सुधारण्याचे वचन देतो. मात्र असे न करता तुमचा पार्टनर अनेकदा तुमच्यासोबत पूर्वीप्रमाणेच वागतो. पण तुम्ही तुमच्या पार्टनरला पुन्हा पुन्हा सुधारणाची संधी देत राहता. त्यामुळे हे देखील ट्रॉमा बाँडचे लक्षण असू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT