mobile radiation  google
लाईफस्टाईल

Phone Risks: उशीजवळ फोन ठेवून झोपणं घातक आहे का?

Sleeping With Smartphone : मोबाईल फोन डोक्याजवळ ठेवून झोपण्याची सवय झोपेचा क्रम बिघडवते, मेलाटोनिन कमी करते, रेडिएशन वाढवते आणि मानसिक ताण, थकवा, चिडचिड यांसारखे दुष्परिणाम निर्माण करते, असा तज्ज्ञांचा इशारा.

Sakshi Sunil Jadhav

मोबाईल हा दैनंदिन आयुष्यातला अविभाज्य घटक झाला आहे. मोबाईल सकाळी उठल्यापासून ते अगदी झोपेपर्यंत आपल्याला आपल्या जवळ असतो. पण ही सवय आरोग्यासाठी किती धोकादायक ठरू शकते याबाबत तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. रात्री फोन अगदी जवळ ठेवल्यामुळे झोपेचा नैसर्गिक क्रम बिघडतो. मेंदूला पूर्ण विश्रांती घ्यायच्या वेळेस तो नेमकी बाजूला असतो. याचा परिणाम झोपेवर होतो आणि शरीराची संपूर्ण कार्यप्रणाली विस्कळीत होते. इतकेच नाही, तर थकवा, तणाव आणि मानसिक अस्वस्थता वाढू शकते.

अनेकांना वाटतं की, फोन बाजूला असेल आणि तो वापरत नसू तर काही प्रॉब्लेम होत नाही. पण हा गैरसमज आहे. फोन बाजूला किंवा वापरत नसतानाही काही प्रमाणात रेडिएशन सोडत राहतो आणि हे रेडिएशन झोपेमध्ये अडथळा निर्माण करते. काही दिवसांनी या सवयीमुळे डोकेदुखी, चिडचिड, एकाग्रता कमी होणे आणि मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. मोबाइलचा निळा प्रकाश मेलाटोनिन या झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोनच्या निर्मितीवर परिणाम करतो आणि त्यामुळे बायोलॉजिकल क्लॉक बिघडते.

रिसर्च सेंटरच्या अहवालानुसार, 65% प्रौढ आणि तब्बल 90% किशोरवयीन मुले फोन हातात घेऊनच झोपतात किंवा फोन उशाजवळ ठेवतात. इंटरनेट ब्राऊज वापरता वापरता झोपणे, सकाळी लवकर उठण्यासाठी फोन जवळ ठेवणे किंवा चॅटिंग करत करत झोपणे ही अनेकांची रोजची सवय झाली आहे. याने नकळत शरीराला त्रास होतो. झोपेची गुणवत्ता कमी होते आणि सकाळी उठल्यावर ताजेपणा जाणवत नाही. चुकीच्या झोपेमुळे मूड खराब राहणे, थकवा न जाणे आणि दिवसाची ऊर्जा कमी होणे या तक्रारी वाढू लागतात.

कोणतेही ठरलेले अंतर सांगितले नसले तरी किमान तीन फूट अंतरावर फोन ठेवला तर रेडिएशनचा परिणाम खूपच कमी होतो. फोन उशाशी ठेवण्याची सवय विशेषतः धोकादायक मानली जाते कारण त्या वेळी रेडिएशनचा संपर्क अगदी जवळून होतो. तज्ज्ञांच्या मते, रात्री झोपताना फोन एअरप्लेन मोडवर ठेवणे, बेडपासून लांब ठेवणे आणि झोपण्यापूर्वी स्क्रीनकडे अनावश्यकपणे न पाहणे हे उपाय अत्यंत उपयुक्त ठरतात. योग्य, शांत आणि पुरेशी झोप मिळाली तर मेंदू अधिक निरोगी राहतो, शरीर पुन्हा ऊर्जा मिळवते आणि मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.

BMC Election: मुंबईत ठाकरेसेनेला मोठं खिंडार, बड्या महिला नेत्यासह पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

Maharashtra Live News Update : अहिल्यानगर मनपा निवडणुकीत अजित पवार गटाच्या कुमार वाकळे यांची बिनविरोध निवड...

Health Tips : सावधान! जेवणानंतरची एक चूक पडेल महागात,आताच सोडा 'ही' सवय

Rent Agreement: घरमालक-भाडेकरुंसाठी ५ नवे नियम, एकही मोडला तर होणार दंड, आताच नोट करा

CNG-PNG Price Drop: नवीन वर्षात आनंदाची बातमी! CNG-PNG झाला स्वस्त; आजचे पेट्रोलचे दर काय?

SCROLL FOR NEXT