Lord Ganesha dream meaning saam tv
लाईफस्टाईल

Lord Ganesha dream meaning: विसर्जनानंतर स्वप्नात गणपती बाप्पा दिसतोय का? काय असतो याचा अर्थ, मिळतात हे संकेत

Ganesh Visarjan dream: गणेश विसर्जनानंतर स्वप्नात गणपती बाप्पा दिसला तर त्याचा अर्थ काय? स्वप्नशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार गणपतीचं दर्शन, पूजा, मूषकावर बसलेले बाप्पा आणि आरती दिसण्याचे संकेत जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

गणेशोत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. अनंत चतुर्दशीला २५ सप्टेंबर रोजी बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणरायाच्या विसर्जनावेळी अनेक भक्त भावूक होतात. बाप्पाला निरोप देताना डोळ्यांत पाणी येतं. मात्र विसर्जन झाल्यानंतरही अनेक दिवस मनात बाप्पाची प्रतिमा राहते.

अशातच काही जणांना विसर्जनानंतरच्या काळात स्वप्नात भगवान गणेशाचं दर्शन होतं. मग अशा स्वप्नाचा अर्थ काय? बाप्पा स्वप्नात दिसणं शुभ मानलं जातं का? याबाबत स्वप्नशास्त्र आणि धार्मिक मान्यतांमध्ये काही संकेत सांगितले आहेत. ते जाणून घेऊया.

विसर्जनानंतर स्वप्नात गणेशजी दिसले तर काय समजावं?

स्वप्नशास्त्रातील मान्यतेनुसार, स्वप्नात गणपतीचं दर्शन होणं शुभ मानलं जातं. गणपतीला विघ्नहर्ता आणि प्रथम पूज्य देव मानलं जातं. त्यामुळे स्वप्नात बाप्पा दिसणं हे आयुष्यातील अडचणी दूर होणं, एखादी चांगली बातमी मिळणं किंवा नव्या कामाची सुरुवात होण्याशी जोडलं जातं.

स्वप्नात गणपतीची पूजा करताना दिसणं

जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात स्वतः गणपतीची पूजा करत असल्याचं दिसलं, तर तेही शुभ मानलं जातं. स्वप्नाशी संबंधित मान्यतांमध्ये देवाची पूजा करणं किंवा देवाचं दर्शन होणं हा सकारात्मक संकेत मानला जातो. असं स्वप्न अडकलेली कामं पुढे जाणं आणि आयुष्यात एखादी चांगली संधी मिळणं याच्याशी जोडलं जातं.

मूषकावर बसलेले बाप्पा दिसले तर...

गणपती बा्प्पाचं वाहन मूषक आहे. त्यामुळे स्वप्नात बाप्पा मूषकावर बसलेले दिसणंही काही ज्योतिषीय मान्यतांमध्ये शुभ संकेत मानलं जातं. अशा स्वप्नाचा संबंध कामात यश मिळणं, अडचणींवर मात करता येणं आणि आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता यांच्याशी जोडली जाते.

स्वप्नात गणपतीची आरती करताना दिसणं

जर स्वप्नात आपण तुम्ही गणपतीची आरती करत असाल तर धार्मिक मान्यतेनुसार हेही चांगलं लक्षण मानलं जातं. अशा स्वप्नाचा अर्थ जीवनात सुख-शांती येणं, एखादी चांगली बातमी मिळणं आणि नव्या गोष्टीची सुरुवात होणं असा घेतला जातो.

डिस्क्लेमर

या बातमीमध्ये हिंदू धार्मिक परंपरेत आढळणारी माहिती देण्यात आली आहे. यातील उल्लेख हे धार्मिक ग्रंथ व श्रद्धांवर आधारित असून, त्यांना वैज्ञानिक तथ्य किंवा सिद्ध झालेले सत्य म्हणून घेऊ नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Turmeric Price : मोठी बातमी! हळदीने गाठला विक्रमी उच्चांक; ९ वर्षांनंतर भाव थेट 'तितक्या' हजारांवर

Sabudana Vada Recipe : १० मिनिटांत बनवा कुरकुरीत साबुदाणा वडे, पाहा सोपी ट्रिक

Maharashtra News Live Update: पुण्यात राजस्थानच्या तिघांकडून ७८ हजारांचे अफीम जप्त; तस्करीचे रॅकेट उघडकीस

भाजपमध्ये आणखी एक राष्ट्रीय पक्ष विलीन होणार? पडद्यामागे घडामोडींना वेग

Good News: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दुष्काळाची आर्थिक मदत वाढली, किती पैसे मिळणार?

SCROLL FOR NEXT