Recurring dreams: वारंवार एकच स्वप्न पडत असेल तर त्याचा अर्थ काय असतो?

Surabhi Jayashree Jagdish

स्वप्नशास्त्रानुसार मिळणारे संकेत

स्वप्नशास्त्रात वारंवार एकच स्वप्न पडणं हे जीवनातील एखाद्या महत्त्वाच्या संकेताचं प्रतीक मानलं जातं. अशा स्वप्नांमधून भविष्यातील घटना, मनातील चिंता किंवा अपूर्ण राहिलेल्या गोष्टींकडे लक्ष वेधलं जात असल्याची श्रद्धा आहे.

Dream meaning | saam tv

पूर्वजन्माशी संबंध

स्वप्नशास्त्रातील काही मतांनुसार, एकच स्वप्न वारंवार पडणं हे पूर्वजन्माशी संबंधित असू शकतं. पूर्वजन्मातील काही अपूर्ण कामं किंवा इच्छा पूर्ण न झाल्यास त्यांचे प्रतिबिंब स्वप्नांमध्ये दिसतं. ही संकल्पना धार्मिक आणि आध्यात्मिक श्रद्धांवर आधारित असून ती सिद्ध झालेली वैज्ञानिक वस्तुस्थिती नाही.

Dream science | saam tv

अपूर्ण इच्छा

काही श्रद्धांनुसार, अशी स्वप्नं व्यक्तीला अपूर्ण राहिलेल्या इच्छा किंवा जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. त्या गोष्टी पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास आत्मिक समाधान मिळू शकतं, असं मानण्यात येतं.

Mental health | saam tv

प्रिय व्यक्ती स्वप्नात दिसल्यास

जर स्वप्नात एखादी प्रिय व्यक्ती किंवा पूर्वज काही सांगताना, मागताना किंवा विचारताना दिसले तर त्यांच्या इच्छेकडे लक्ष देण्याचा सल्ला स्वप्नशास्त्रात दिला जातो. त्यांच्या स्मरणार्थ एखादं चांगलं कार्य, दानधर्म किंवा धार्मिक विधी करण्याची काही जणांची श्रद्धा असते.

Anxiety dreams | saam tv

एकच जागा किंवा घर वारंवार दिसणं

स्वप्नात एखादी विशिष्ट जागा किंवा घर पुन्हा पुन्हा दिसत असेल तर त्यामागे काही विशेष संकेत असल्याचं स्वप्नशास्त्र मानतं. शक्य असल्यास त्या ठिकाणाविषयी माहिती घेणं किंवा ते ठिकाण पाहणं उपयुक्त ठरू शकतं.

Dream analysis | saam tv

मनाची अवस्था आणि स्वप्नं

स्वप्नं ही मनाच्या विशिष्ट अवस्थेत निर्माण होणारी अनुभूती असते ज्यामध्ये अनेकदा वास्तवाचा भास होतो. दिवसभरातील अनुभव, भावना, चिंता आणि आठवणी यांचा स्वप्नांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे एकच स्वप्न वारंवार पडण्यामागे मानसिक कारणंही असू शकतात.

Sleep disorders | saam tv

खाण्याचा आरोग्यावर परिणाम

झोपण्यापूर्वीचे अयोग्य खान-पान, अपुरी झोप किंवा काही आजारांमुळे स्वप्नांचं स्वरूप बदलू शकतं. मानसिक ताण, चिंता, नैराश्य किंवा काही औषधांचाही वारंवार येणाऱ्या स्वप्नांवर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे सतत त्रासदायक स्वप्नं पडत असतील तर तज्ज्ञ डॉक्टर किंवा मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य आहे.

Emotional health | saam tv

Mahabharata: महाभारतात शकुनीचा वध कोणी केला?

Kurukshetra War | saam tv
येथे क्लिक करा