Morning mouth bitterness: सकाळी उठल्यावर तोंडात कडवटपणा का जाणवतो? कारण तुम्हालाही माहिती नसेल

Surabhi Jayashree Jagdish

फ्रेश वाटण्याची अपेक्षा

प्रत्येक व्यक्तीला झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटावं असं वाटतं. चांगली झोप आणि आराम यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक होते.

सकाळी होणाऱ्या सामान्य समस्या

काही लोकांना उठल्यावर लगेचच त्रास जाणवतो. यामध्ये डोकेदुखी, अंगदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात फारशी चांगली होत नाही.

तोंडात कडवटपणा जाणवणं

काही लोकांना सकाळी उठल्यावर तोंडात कडवटपणा जाणवतो. हा अनुभव खूप सामान्य असला तरी दुर्लक्षित करू नये. यामागे अनेक कारणं असू शकतात.

ओरल हेल्थचा परिणाम

रात्री झोपताना तोंडात बॅक्टेरिया जमा होऊ शकतात. त्यामुळे सकाळी उठल्यावर दुर्गंधी आणि कडवटपणा जाणवतो. योग्य तोंडाची स्वच्छता न ठेवल्यास ही समस्या वाढू शकते.

पाण्याची कमतरता

झोपण्यापूर्वी पाणी न प्यायल्यास तोंड कोरडे पडते. यामुळे सकाळी उठल्यावर कडवटपणा जाणवू शकतो. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास हा त्रास अधिक वाढतो.

सायनस समस्या

पोटात अॅसिड जास्त प्रमाणात तयार झाल्यास तोंड कडवट होऊ शकते. तसंच सायनसच्या त्रासामुळे गळ्यात कफ साचतो. यामुळेही सकाळी कडवटपणा जाणवू शकतो.

औषधांचा परिणाम

काही वेळा रात्री घेतलेल्या औषधांमुळे तोंडात कडवटपणा येतो. हा औषधांचा साइड इफेक्ट असू शकते. त्यामुळे अशी समस्या वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

Women attraction psychology: पुरुषांच्या 'या' वाईट सवयींकडे लगेच आकर्षित होतात महिला

attraction factors
येथे क्लिक करा