Overeating Tomato Side Effects Saam Tv
लाईफस्टाईल

Overeating Tomato Side Effects : तुम्हालाही टोमॅटो खायला आवडतात? वेळीच थांबा, जडू शकतात अनेक आजार !

टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते का ?

कोमल दामुद्रे

Overeating Tomato Side Effects : लाल लाल रसाळ टोमॅटो खायची सवय अनेकांना असते.काही फळे आणि भाज्या आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात, पण त्यांचं जास्त सेवन केल्याने तुमचं आरोग्य बिघडतं. टोमॅटोचाही यात समावेश होतो.

टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकते. कारण टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन्स आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक घटक असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतातच पण ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारकही असतात. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने काय तोटे होतात?

टोमॅटो खाण्याचे आरोग्याला होणारे नुकसान

1. ऑसिडिटीची समस्या

टोमॅटोमध्ये (Tomato) व्हिटॅमिन-सी चांगल्या प्रमाणात असते त्यामुळे टोमॅटो आम्लयुक्त आहे. म्हणूनच याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने ऑसिडिटीची त्रास होऊ शकतो. त्यामुळे टोमॅटोचे अतिसेवन टाळावे.

2. गॅस समस्या

गॅसची समस्या असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन टाळावे कारण टोमॅटोमुळे पोटात (Stomach) गॅस तयार होतो. त्यामुळे गॅसची समस्या टाळण्यासाठी टोमॅटोचे सेवन टाळावे.त्यामध्ये काळे मीठ घातल्यास गॅसच्या समस्येपासून काही प्रमाणात आराम मिळू शकतो.

Overeating Tomato Side Effects

3. किडनी स्टोन

स्टोनच्या रुग्णांनी चुकूनही टोमॅटोचे सेवन करू नये. कारण टोमॅटोच्या बियांमुळे खड्यांची समस्या वाढू शकते. दुसरीकडे, तुम्ही जरी टोमॅटोचे सेवन केले तरी आधी टोमॅटोचे दाणे वेगळे करा.त्यामुळे स्टोन असणाऱ्याला डॉक्टर (Doctor) नेहमी टोमॅटो किंवा बिया असणाऱ्याला फळे भाज्या न खाण्याचा सल्ला देतात.

4. छातीत जळजळ

जर तुम्ही टोमॅटोचे जास्त सेवन केले तर तुम्हाला छातीत जळजळ होण्याची समस्या होऊ शकते. कारण टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन (Vitamins) सी भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे गॅसची समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे छातीत जळजळ सारखी समस्या उद्भवू शकते.त्यामुळे जर तुम्ही टोमॅटोचे जास्त सेवन करत असाल तर काळजी घ्या.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEET Paper Leak: फेरपरीक्षेचा पेपरही फुटल्याचा दावा; 21 जूनचा NEET पेपर 10 लाखांत?

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; निकटवर्तीय महिला नेत्याने दिला पक्षाच्या पदाचा राजीनामा

Shocking: भारतमातेचं रक्षण करणाऱ्या जवानाला न्याय मिळेना; ITBP जवानावर आईचा तुटलेला हात घेऊन भटकण्याची वेळ

एक वर्षात सरकार कोसळेल; बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT