First Rain Of Monsoon freepik
लाईफस्टाईल

Monsoon: पावसात भिजायला आवडतं का? मग हे 5 आरोग्यदायी फायदे नक्की वाचा

Rainy Season Vibes: पावसाचं पाणी नैसर्गिक औषधासारखं कार्य करतं. ते शरीरातील उष्णता कमी करतं, त्वचेच्या त्रासांपासून आराम देतं आणि निसर्गोपचार तज्ज्ञांनुसार आरोग्यास लाभदायक ठरतं.

Dhanshri Shintre

पावसाचे टपटपणारे थेंब केवळ हवामान थंड करत नाहीत, तर मनालाही एक अनोखा आनंद देतात. पहिल्या पावसाच्या सरींसोबत येणारा मातीचा सुगंध वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. मात्र पावसात भिजणं हे केवळ मजेशीर नसून आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. आयुर्वेद व आधुनिक संशोधनानुसार, पावसाचं पाणी नैसर्गिक औषधासारखं कार्य करतं. ते शरीरातील उष्णता कमी करतं आणि त्वचेच्या त्रासांपासून, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, किडनी सिस्टसारख्या समस्यांपासून आराम देण्यास मदत करतं.

पावसात आंघोळ केल्याने त्वचेवरची मळ आणि मृत पेशी निघून जातात, आणि मनालाही शांती मिळते. हे शरीराचं तापमान संतुलित ठेवण्याचा नैसर्गिक मार्ग आहे. पूर्वी वडीलधारी मंडळी पावसात भिजायला सांगायचे, कारण यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि संपूर्ण आरोग्यास लाभ होतो.

पावसात भिजल्याने एंडोर्फिन व सेरोटोनिनसारखे आनंददायक हार्मोन्स सक्रिय होतात, जे तणाव कमी करून मन प्रसन्न करतात. हे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. शिवाय, पावसाचं पाणी त्वचेचं पीएच संतुलन राखतं आणि त्वचेला नैसर्गिक चमक देतं, ज्यामुळे त्वचा अधिक ताजीतवानी आणि निरोगी दिसते.

मूत्रपिंडात सिस्ट ही शरीरातील वाढलेल्या उष्णतेमुळे होणारी समस्या आहे. काहीजण पावसात भिजणं अपायकारक मानतात, पण प्रत्यक्षात ते आरोग्यास फायदेशीर आहे. पावसात आंघोळ केल्याने उष्णता कमी होते, मुरुम व फोड दूर होतात. त्यामुळे स्वतःही पावसात भिजा आणि मुलांनाही भिजण्यास प्रोत्साहित करा, हे आरोग्यदायी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT