Vastu Tips saam tv
लाईफस्टाईल

Vastu Tips : रात्री कपडे धुण्याची सवय आहे? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या कपडे धुण्याची योग्य वेळ

Best Time to Wash Clothes: वास्तुशास्त्रानुसार कपडे धुण्याची योग्य वेळ कोणती? सकाळी कपडे धुणे शुभ का मानले जाते, सूर्यास्तानंतर कपडे धुण्याबाबत कोणत्या मान्यता आहेत आणि ओले कपडे व्यवस्थित वाळवण्यासाठी कोणत्या व्यावहारिक गोष्टी लक्षात ठेवाव्यात, जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

आजकालच्या धावपळीच्या जीवनात अनेकांना सकाळी घरातील कामं करण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे काही जण रात्री कपडे धुणे पसंत करतात. मात्र वास्तुशास्त्रानुसार कपडे धुण्याची योग्य वेळ कोणती, याबाबत काही नियम सांगितले आहेत.

कपडे धुण्याच्या वेळेचा घरातील वातावरणावर परिणाम होतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. त्यामुळे सकाळी कपडे धुणं चांगलं मानलं जातं तर संध्याकाळी आणि रात्री कपडे धुणं टाळण्याचा सल्ला दिला जातो. याबाबत वास्तू शास्त्रात कोणते नियम सांगितलेत ते पाहूयात.

सकाळी कपडे धुणे का मानले जाते शुभ?

वास्तुशास्त्रानुसार, सकाळची वेळ सकारात्मक ऊर्जेसाठी चांगली मानली जाते. सूर्योदयानंतर घरात आणि आजूबाजूच्या परिसरात प्रकाश आणि ताजेपणा असतो. त्यामुळे सकाळी कपडे धुणं शुभ मानलं जातं. याचा एक व्यावहारिक फायदाही आहे. सकाळी धुतलेले कपडे दिवसभर उन्हात आणि मोकळ्या हवेत वाळवता येतात. त्यामुळे कपडे लवकर आणि चांगल्या प्रकारे सुकण्यास मदत होते.

सकाळी वेळ मिळत नसेल तर काय करावं?

प्रत्येकालाच सकाळी कपडे धुणं शक्य होतं असं नाही. कामाची घाई किंवा इतर जबाबदाऱ्यांमुळे सकाळी वेळ मिळत नसेल, तर दुपारीही कपडे धुता येतात.

दुपारच्या वेळी सूर्यप्रकाश चांगला असतो. त्यामुळे कपडे लवकर वाळण्यास मदत होते. म्हणूनच सकाळनंतर दुपारची वेळ कपडे धुण्यासाठी योग्य पर्याय मानली जाते.

सूर्यास्तानंतर कपडे धुणं का टाळावं?

वास्तुशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर कपडे धुणे शुभ मानले जात नाही. रात्रीच्या वेळी नैसर्गिक सकारात्मक ऊर्जा कमी होते, अशी यामागे मान्यता आहे. या वेळेत धुतलेल्या कपड्यांवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव राहू शकतो, असंही मानलं जातं. त्यामुळे वास्तुशास्त्राच्या मान्यतेनुसार, शक्य असल्यास सूर्यास्तानंतर कपडे धुणं टाळावं, असा सल्ला दिला जातो.

रात्री कपडे धुतल्याने ओलाव्याचा त्रास होऊ शकतो

रात्री कपडे धुतल्यावर त्यांना पुरेसा सूर्यप्रकाश आणि हवा मिळत नाही. त्यामुळे कपडे सुकण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो. कपडे बराच वेळ ओले राहिल्यास त्यांना कुबट वास येण्याची शक्यता असते.

वास्तुशास्त्रात ओलावा आणि अस्वच्छता यांचा संबंध नकारात्मकतेशी जोडला जातो. त्यामुळे रात्री कपडे धुणं टाळावं, अस सांगितलं जातं. मात्र हा वास्तुशास्त्रातील समज आहे. कपडे रात्री धुतल्याने नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, याला वैज्ञानिक पुरावा नाही.

कपडे धुताना या गोष्टी लक्षात ठेवा

वास्तुशास्त्रानुसार, घरातील स्वच्छतेचा संबंध सकारात्मक वातावरणाशी जोडला जातो. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासोबतच कपडेही वेळेवर धुणं आणि व्यवस्थित वाळवणं महत्त्वाचं मानलं जातं.

ओले कपडे बराच वेळ घरात ठेवू नयेत. शक्यतो ते मोकळ्या हवेत आणि प्रकाश मिळेल अशा ठिकाणी वाळवावेत. कपडे धुण्यासाठी सकाळची वेळ निवडणं चांगलं मानलं जातं. सकाळी शक्य नसेल, तर दुपारी कपडे धुण्याचा पर्याय निवडता येतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Hand Sweating Problem: हाताला घाम का येतो? शरीरात नेमकं काय घडतं तेव्हा असं होतं?

Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट, आणखी एकाला अटक; हरियाणा कनेक्शन उघड

Maharashtra News Live Update: बीडमध्ये दोन दसरा मेळावे; मनोज जरांगे आणि मुंडे बंधूंच्या भाषणाकडे राज्याचं लक्ष

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट? डीए वाढीबाबत मोठी अपडेट

Gold Rate Today: दसऱ्याच्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण, १० तोळा ८,७०० रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

SCROLL FOR NEXT