Underarm odor saam tv
लाईफस्टाईल

Underarm odor: काखेतून वारंवार घामाचा वास येतोय? आंघोळीदरम्यान हा 1 छोटासा बदल करेल दुर्गंधीची समस्या दूर

How to reduce underarm odor naturally: उन्हाळ्यात अंडरआर्म्समधून येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास कमी करण्यासाठी आंघोळ करताना कोणता बॉडी वॉश वापरावा, बेंझॉयल पेरॉक्साइडचे फायदे, दुर्गंधीची कारणे आणि योग्य स्वच्छता कशी राखावी याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

उन्हाळ्यात घाम जास्त येणं ही अगदी सामान्य गोष्ट आहे. मात्र अनेकांना अंडरआर्म्समधून (काखेतून) येणाऱ्या दुर्गंधीचा त्रास होतो. रोज आंघोळ करून, परफ्यूम किंवा डिओडरंट वापरूनही काही तासांत पुन्हा घामाचा वास यायला लागतो. अशा वेळी फक्त प्रोडक्ट्स वापरण्यापेक्षा आंघोळ करताना एक छोटासा बदल केला तर या समस्येवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवता येऊ शकते.

अंडरआर्म्समधून दुर्गंधी का येते?

आपल्या शरीरात असलेल्या स्वेट ग्लँड्समधून घाम तयार होतो. काखेच्या भागात 'अपोक्राइन' प्रकारच्या घामग्रंथी असतात. या भागातून येणारा घाम त्वचेवर असलेल्या बॅक्टेरियांच्या संपर्कात आला की त्यातून दुर्गंधी निर्माण होते. याशिवाय सतत राहणारा ओलावा, खूप घट्ट कपडे घालणं, हार्मोन्समधील बदल आणि शरीराची योग्य स्वच्छता न राखणं यामुळेही ही समस्या अधिक वाढू शकते.

दुर्गंधी कमी करण्यासाठी काय करावं?

अंडरआर्म्समधून वारंवार दुर्गंधी येत असेल तर आंघोळ करताना नेहमीचा साबण वापरण्याऐवजी अँटीबॅक्टेरियल किंवा मेडिकेटेड बॉडी वॉश वापरावा. अशा प्रकारचा बॉडी वॉश त्वचेवरील दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांची संख्या कमी करण्यास मदत करू शकतो. मात्र बॉडी वॉश निवडताना तो आपल्या त्वचेच्या प्रकाराला योग्य आहे का, याची खात्री करून घ्या.

कोणता बॉडी वॉश उपयोगी ठरू शकतो?

बेंझॉयल पेरॉक्साइड (Benzoyl Peroxide) असलेला बॉडी वॉश या समस्येसाठी फायदेशीर ठरू शकतो. हा बॉडी वॉश अंडरआर्म्सवर लावल्यानंतर तो साधारण २ ते ४ मिनिटं तसाच राहू द्या. त्यानंतर स्वच्छ पाण्याने धुऊन टाका. यामुळे दुर्गंधी निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांचं प्रमाण कमी होण्यास मदत होऊ शकते आणि घामाच्या वासाची समस्या काही प्रमाणात आटोक्यात येऊ शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- साथीच्या आजारांचा धोका वाढला

Health Tips : पावसाळ्यात भिजल्यावर सतत ताप येतो? आहारात करा 'हा' बदल, आजारपण होईल गायब?

पीरियड्सच्या दिवसात थंड पाणी प्यावं की गरम? काय म्हणतात डॉक्टर्स?

Frequent urination at night: पावसाळ्यात रात्री वारंवार लघवीला उठावं लागतंय? मग 'या' चुका अजिबात करू नका

Rajapur Waterfall : प्राचीन शिव मंदिराच्या शेजारी वसलाय कोकणातील सर्वात सुंदर धबधबा, राजापूरजवळ आहे 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT