Sour Burps Causes saam tv
लाईफस्टाईल

Sour Burps Causes: सकाळी उठल्यावर आंबट ढेकर येतायत? एसिडिटी नाही तर लिव्हर खराब होण्याचे हे आहेत 6 संकेत

सतत आंबट ढेकर येणं किंवा तोंडात आंबट चव येणं ही केवळ ॲसिडिटीची समस्या नसू शकते. पचनसंस्थेचे विकार, एच. पायलोरी संसर्ग किंवा ॲसिड रिफ्लक्सची लक्षणं असू शकतात. जाणून घ्या कारणं आणि उपाय.

Surabhi Jayashree Jagdish

जर तुम्हाला सकाळी उठल्यावर तोंडात आंबट चव किंवा वारंवार आंबट ढेकर येत असतील तर तुम्ही याकडे सामान्य ॲसिडिटी म्हणून दुर्लक्ष करू नये. डॉक्टरांच्या मते, हे पचनसंस्थेतील समस्या, ॲसिड रिफ्लक्स, पोटाचा संसर्ग किंवा यकृताच्या समस्यांचं लक्षण असू शकतं. खाण्याच्या चुकीच्या सवयी, रात्री उशिरा जेवणं आणि तणाव यामुळे ही समस्या वाढू शकतात.

तज्ञांच्या मते, जेव्हा पोटात तयार होणारं हायड्रोक्लोरिक ऍसिड जास्त प्रमाणात तयार होतं किंवा अन्न योग्य पद्धतीने पचत नाही तेव्हा ते अन्ननलिकेतून वरच्या बाजूला येऊ लागतं. यामुळे आंबट ढेकर येणं, छातीत जळजळ, तोंडात कडू चव आणि गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.

जीवनशैली हा देखील एक महत्त्वाचा घटक मानला जातो. रात्री उशिरा तळलेलं आणि मसालेदार पदार्थ खाणं, कोल्ड ड्रिंक्स, मद्यपान, धूम्रपान, घाईघाईने जेवणं आणि जेवणानंतर लगेच झोपणं यामुळे पोटातील पीएच पातळी बिघडू शकते. यामुळे गॅस जमा होतो आणि ढेकर येण्याची समस्या अधिकच वाढते. तणाव आणि अपुरी झोप यामुळेही ही समस्या आणखी वाढू शकते.

काही प्रकरणांमध्ये, आंबट ढेकर येणं हे केवळ आम्लपित्ताचेच नव्हे तर पोटातील बॅक्टेरीयाचंही लक्षण असू शकतात. काही रिपोर्ट्सनुसार, एच. पायलोरी (H. pylori) बॅक्टेरिया किंवा पचनसंस्थेच्या समस्यांमुळे दुर्गंधीयुक्त ढेकर, पोट फुगणं आणि ॲसिड रिफ्लक्स होऊ शकतो.

ही 6 लक्षणं दिसली तर तपासणी करून घ्या

डॉक्टरांच्या मते, जर तुम्हाला आठवड्यातून अनेक वेळा सतत आंबर ढेकर येत असतील आणि त्यासोबत पोटदुखी, उलट्या, जुलाब, वजन कमी होणं किंवा गिळण्यास त्रास होत असेल, तर तुम्ही ताबडतोब तपासणी करून घेतली पाहिजे. दीर्घकाळच्या आम्लपित्तामुळे अन्ननलिकेच्या आणि लिव्हरच्या गंभीर आजारांचा धोकाही वाढू शकतो.

आयुर्वेदात सांगितले उपाय

या समस्येपासून आराम मिळवण्यासाठी आयुर्वेदात अनेक सोपे घरगुती उपाय सुचवले आहेत. जेवणानंतर बडीशेप आणि खडीसाखर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि गॅस कमी होण्यास मदत होते. मध मिसळलेलं कोमट पाणी पिणं देखील फायदेशीर मानलं जातं. रिकाम्या पोटी नारळाचे पाणी प्यायल्याने पोटातील पित्त नियंत्रित राहण्यास आणि शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nashik Crime: साधूच्या वेशात सोन्याची लूट, भुरळ पाडून लाखोंचे दागिने लंपास; VIDEO व्हायरल

Radha Patil Dance: राधा पाटलावर गुन्हा, ऐश्वर्याला परवानगी नाकारली; कलाकारांचा बिभत्स डान्स आयोजकांनाही भोवणार

MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश! पुणे-कोल्हापुरात विद्यार्थी रस्त्यावर, अध्यक्ष अन् सचिवांच्या राजीनाम्याची मागणी

Maharashtra Politics: ठाकरेसेनेचे नगरसेवक बाद करण्याचा डाव? शिंदेसेनेचा मोठा डाव!

Manoj Jarange: मनोज जरांगेंना हल्ल्याची भीती, शिंदेसेनेचे 2 मंत्री आणि 2 प्रवक्यांवर खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT