Migraine Home Remedies saam tv
लाईफस्टाईल

Migraine Home Remedies: मायग्रेनचा त्रास होताच तुम्हीही करता का हे घरगुती उपाय? डॉक्टरांनी सांगितलं, कोणते उपाय खरंच ठरतात फायदेशीर!

Migraine Symptoms: मायग्रेनचा त्रास होत असताना फ्रेंच फ्राइज, शीतपेय, थंड पट्टी किंवा मायग्रेन कॅप वापरणे किती फायदेशीर आहे? बोटॉक्स उपचार, पाणी पिणे आणि शांत खोलीत विश्रांती घेण्याबाबत डॉक्टरांचे मत जाणून घ्या.

Surabhi Jayashree Jagdish

मायग्रेन म्हणजेच अर्धशिशीचा त्रास अनेकांना होतो. हा त्रास केवळ डोकेदुखीपुरता मर्यादित नसतो. त्याचा परिणाम माणसाच्या रोजच्या कामांवर, झोपेवर आणि जीवनमानावरही होतो. मायग्रेनचा त्रास सुरू झाल्यानंतर आराम मिळावा यासाठी अनेक जण घरगुती उपाय करतात. काही उपायांमुळे तात्पुरता आराम मिळू शकतो. पण हे उपाय खरोखर किती फायदेशीर आहेत, याबाबत डॉक्टरांनी माहिती दिलीये.

फ्रेंच फ्राइज आणि शीतपेय

मायग्रेनचा त्रास होत असताना काही जण फ्रेंच फ्राइज आणि शीतपेय घेतात. शीतपेयातील कॅफिनमुळे काही वेळासाठी आराम मिळू शकतो. त्याचप्रमाणे शरीरात पाण्याची कमतरता असल्यास फ्रेंच फ्राइजमधील मीठ काही प्रमाणात उपयोगी ठरू शकते. पण मायग्रेनवरील उपाय म्हणून वारंवार फास्ट फूड खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही.

डोक्यावर थंड पट्टी आणि पाय गरम पाण्यात ठेवणं

मायग्रेनचा त्रास होत असताना डोक्यावर बर्फाची थंड पट्टी ठेवल्याने आराम मिळू शकतो. पण पाय गरम पाण्यात ठेवल्याने मायग्रेन कमी होतो, याबाबत ठोस वैद्यकीय पुरावा उपलब्ध नाही.

बोटॉक्स उपचार किती फायदेशीर?

वारंवार मायग्रेनचा त्रास होत असल्यास बोटॉक्स म्हणजेच बोटुलिनम टॉक्सिनचा वापर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून प्रभावी ठरू शकतो. पण हा लगेच आराम देणारा उपाय नाही. त्यासाठी प्रशिक्षित वैद्यकीय तज्ज्ञांकडूनच उपचार घेणं आवश्यक आहे.

भरपूर पाणी पिणं गरजेचं

शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास डोकेदुखीचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे पुरेसं पाणी पिणं महत्त्वाचं आहे. पण जास्त प्रमाणात पाणी प्यायल्याने मायग्रेन थांबत नाही. उलट अतिप्रमाणात पाणी पिणं हानिकारक ठरू शकतं.

मायग्रेन कॅप आणि शांत खोलीत विश्रांती

थंडावा देणारी किंवा डोक्यावर हलका दाब देणारी मायग्रेन कॅप वापरल्याने काही प्रमाणात आराम मिळू शकतो. पण हा केवळ पूरक उपाय आहे. त्याचप्रमाणे प्रकाश आणि मोठ्या आवाजामुळे मायग्रेनचा त्रास वाढू शकतो. अशावेळी शांत आणि अंधाऱ्या खोलीत विश्रांती घेतल्याने लक्षणं कमी होण्यास मदत मिळू शकते.

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Combined Toilet and Bathroom Vastu Tips for Home: घरामध्ये टॉयलेट आणि बाथरूम एकत्र असावे की नाही? वास्तुशास्त्राचे नियम काय सांगतात?

Maharashtra News Live Update: ICC च्या अध्यक्षपदी पुन्हा जय शाह यांची वर्णी

Ration Card Update : रेशनकार्ड विभक्त केल्यावर धान्य बंद झालं, पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावं? वाचा नवीन नियम

Gold Rate Today: आनंदाची बातमी! सोन्याचे दर घसरले, १० तोळा ८,२०० रुपयांनी स्वस्त; १८- २२ आणि २४ कॅरेटचे दर किती?

भाजप राष्ट्रवादीचे विलिनीकरण कधीच होऊ देणार नाही, बड्या नेत्याचा दावा; सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदेंचा दिला संदर्भ

SCROLL FOR NEXT